Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवाला 'या' गंभीर आजाराने होती त्रस्त, स्वतःच केलेला खुलासा; नेमकं काय झालेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:08 IST2025-06-28T09:07:30+5:302025-06-28T09:08:59+5:30
Shefali Jariwala Death Reason: 'कांटा लगा' या गाण्यातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालं आहे.

Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवाला 'या' गंभीर आजाराने होती त्रस्त, स्वतःच केलेला खुलासा; नेमकं काय झालेलं?
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा' या गाण्यातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालं आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्याने शेफालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यावेळी तिचा नवरा आणि अभिनेता पराग त्यागी तिच्यासोबत होता. शेफालीच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
परंतु, शेफाली अनेक वर्षांपासून एका गंभीर आजाराने ग्रस्त होती आणि हा आजार तिच्या कारकिर्दीत अडथळा बनला होता. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री तिच्या आजारपणाबद्दल खुलासा केला होता. वयाच्या १५ वर्षांपासन तिला आकडी (फिट) यायची. लहानपणी शाळेत असताना तिला वर्गामध्ये किंवा रस्त्यावर आकडी येत असे, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होत गेला. त्याबद्दल म्हणालेली, "मला वयाच्या १५ व्या वर्षी पहिल्यांदा फिट आली होती. मला आठवतंय की, त्यावेळी माझ्यावर अभ्यास करण्यासाठी खूप दबाव असायचा. मला वर्गात, स्टेजच्या मागे, रस्त्यावर आणि कुठेही फिट यायची, ज्यामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला. 'कांटा लगा' नंतर, लोकांनी मला विचारलं की मी जास्त काम का करत नाही? तर त्याचं हे कारण आहे." या आजारपणामुळे तिला डिप्रेशनही यायचं, असं अभिनेत्रीने सांगितलं होतं.
जाणून घ्या या आजाराबद्दल...
आकडी येणं म्हणजेच एपिलेप्सी, ज्याला फिट येणे, फेफरे, मिरगी, अपस्मार ही सुद्धा नावं आहेत. आकडी येणं ही एक कॉमन समस्या आहे. या आजारामध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न येता झटका येतो. त्यामुळे रुग्ण आपली शुद्ध हरपून बसतो. आकडी येणाऱ्या रुग्णाला यामुळे असंख्य अडचणींचा सामना कारावा लागतो. बऱ्याचदा आकडी आलेल्या माणसाची दातखिळी देखील बसते.
शेफालीने 'कांटा लगा' या गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. तसंच 'बिग बॉस' हिंदीमध्ये ती झळकली होती. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या मुझसे शादी करोगी चित्रपटातही तिने काम केलं.