'सांग तू आहेस का?' फेम सुलेखा तळवळकरला लेकीचा वाटतो खूप अभिमान, आई इतकीच आहे खूप सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 13:40 IST2021-07-12T13:40:19+5:302021-07-12T13:40:54+5:30
सध्या सुलेखा तळवलकरच्या लेकीची चर्चा होताना दिसते आहे.

'सांग तू आहेस का?' फेम सुलेखा तळवळकरला लेकीचा वाटतो खूप अभिमान, आई इतकीच आहे खूप सुंदर
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सांग तू आहेस का?'ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांना भुरळ घातली आहे. अभिनेत्री सुलेखा तळवळकरने या मालिकेत सुलक्षणाची निगेटिव्ह भूमिका जरी साकारली असली तरीदेखील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसते. मात्र सध्या सुलेखा तळवलकरच्या लेकीची चर्चा होताना पहायला मिळते आहे. त्याला कारणही तसेच आहे.
सुलेखा तळवळकरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिची लेक टियाचे काही फोटो शेअर करत तिचा खूप अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. हे फोटो आहेत सौंदर्य स्पर्धेचे.
ही सौंदर्य स्पर्धा होती मिस दादर २०२१ची. या स्पर्धेत टियाने प्रथम स्थान पटाकावले आहे. ही स्पर्धा जिंकल्याचा आनंद सुलेखा तळवळकरने सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. टियाचे सगळीकडून खूप कौतुक होत आहे.
अभिनेत्री सुलेखा तळवलकर प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांची सून आहे. स्मिता तळवलकर यांचा मुलगा अंबर तळवलकर याच्यासोबत तिने लग्न केले. या दोघांना मुलगा आर्य आणि मुलगी टिया अशी दोन मुले आहेत.
सुरेखा तळवलकर हिची मुलगी टिया ही तिच्या इतकीच सुंदर आहे. तसेच तळवलकर ग्रुप्सचे अनेक ठिकाणी असलेल्या फिटनेस सेंटर्सची जबाबदारी देखील ती सांभाळते. तसेच आईसोबत वेगवेगळ्या रेसिपी यूट्यूब चॅनेलवर शेअर करताना दिसून येते.
टिया अभिनय क्षेत्रात कार्यरत नाही. तिला वेगळ्या क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे.