Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’च्या घराचे फोटो लिक? यंदा काय असणार थीम?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:43 AM2022-07-28T10:43:23+5:302022-07-28T10:44:37+5:30

Bigg Boss 16 : होय, ‘बिग बॉस 16’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक भाग घेतील, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण हो, बीबी हाऊस आतून कसं दिसणार? यावेळी या शोची थीम काय असणार? याचा खुलासा मात्र झाला आहे.

Salman Khan show Bigg Boss 16 house photo leak theme revealed | Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’च्या घराचे फोटो लिक? यंदा काय असणार थीम?

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’च्या घराचे फोटो लिक? यंदा काय असणार थीम?

googlenewsNext

काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘बिग बॉस’ या टीव्हीवरच्या सर्वाधिक वादग्रस्त आणि तितक्याच लोकप्रिय शोचा नवा सीझन सुरू होतोय. होय, ‘बिग बॉस 16’  (Bigg Boss 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा सीझनही सलमान खान (Salman Khan) होस्ट करतोय. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक भाग घेतील, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण हो, ‘बिग बॉस 16’चं घर आतून कसं दिसणार? यावेळी या शोची थीम काय असणार? याचा खुलासा मात्र झाला आहे.
गेल्या वर्षी शोमध्ये जंगल थीम ठेवण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये कोणती थीम असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे.

मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो ‘बिग बॉस 16’ च्या थीमचे असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी बीबी हाऊसची थीम वॉटर असणार आहे. टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, बीबी हाऊस ब्ल्यू कलरने रंगवण्यात येणार आहे. घराच्या भींतींवर अनेक जलचरांचे पोस्टर्स दिसतील. एकंदर काय तर ब्ल्यू है पानी पानी.. प्रमाणे यंदा बीबी हाऊस ब्ल्यू ब्ल्यू होणार आहे. व्हायरल फोटोमध्ये काही तथ्य आहे की नाही याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. परंतु हे फोटो पाहून चाहते मात्र उत्सुक झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सलमानने ‘बिग बॉस 16’चा प्रोमो शूट केला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा प्रोमो रिलीज केला जाणार आहे. साहजिकच ‘बिग बॉस’ प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून शो ऑन एअर होण्याची शक्यता आहे.

‘बिग बॉस 16’मध्ये कोण असणार स्पर्धक?
मीडिया रिपोर्टनुसार, यंदाही सलमान खान हा शो होस्ट करेल. या सीझनमध्ये टीव्ही व बॉलिवूडची काही लोकप्रिय चेहरे बीबी हाऊसमध्ये दिसू शकतात. चर्चा खरी मानाल तर, टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, अर्जुन बिजलानी, टीना दत्ता, सुरभी ज्योती, लॉकअप विजेता मुनव्वर फारुकी, पूनम पांडे यांच्याशी निर्मात्यांनी संपर्क साधल्याच्या बातम्या आल्या आहेत, परंतु अद्याप कोणत्याही स्पर्धकाबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Salman Khan show Bigg Boss 16 house photo leak theme revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.