मनीष गोयंकाच्या भूमिकेत सचिन त्यागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 19:43 IST2016-11-26T19:43:06+5:302016-11-26T19:43:06+5:30

‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अभिनेता सचिन त्यागी लवकरच एंट्री करणार आहे. मालिकेत तो स्वकष्टाने श्रीमंत उद्योगपती ...

Sachin Tyagi plays Manish Goenka | मनीष गोयंकाच्या भूमिकेत सचिन त्यागी

मनीष गोयंकाच्या भूमिकेत सचिन त्यागी

ह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अभिनेता सचिन त्यागी लवकरच एंट्री करणार आहे. मालिकेत तो स्वकष्टाने श्रीमंत उद्योगपती झालेल्या आणि कार्तिकचे (मोहसीन खान) वडील मनीष गोयंकाची भूमिका रंगविणार आहे. सचिनच्या एंट्रीमुळे मालिकेला वेगळी कलाटणी मिळणार असून, प्रेक्षकांनादेखील आगामी काळात बरेचसे ट्विस्ट बघायला मिळतील, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. 

दरम्यान, सचिनने यापूर्वी राजन शहा यांच्या ‘तेरे शहर मे’ या मालिकेत काम केले होते. ‘मी राजन यांना नकार देऊच शकत नाही. त्यांच्या मालिकेत माझ्यासाठी कोणती भूमिका योग्य आहे, हे कळण्याची उत्तम समज त्यांना आहे. मग ती भूमिका छोटी असो की मोठी मी ती स्वीकारीनच’ असे सचिन त्यागीने सांगितले. 
आपल्या भूमिकेविषयी सचिन म्हणाला, ‘मनीष गोयंका हा शब्दाला पक्का असतो. त्याने एखादी भूमिका घेतली की, त्यापासून तो कधी ढळत नाही. तो खंबीर मनाचा आणि स्वकष्टाने श्रीमंत झालेला माणूस आहे.

त्याला दोन मुले आणि मुलगी अशी तीन मुले आहेत. मला आता ही भूमिका साकारण्याची उत्सुकता लागली असल्याचे तो सांगतो. सचिनच्या एंट्रीमुळे आता हे गोयंका कुटुंब मालिकेला कोणते नवे वळण देतात, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Sachin Tyagi plays Manish Goenka