'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर रुचिताने मागितली प्रेक्षकांची माफी, म्हणाली- "मी चुकीच्या गोष्टी केल्या... "
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 11:20 IST2026-03-08T11:19:16+5:302026-03-08T11:20:50+5:30
काल 'बिग बॉस मराठी ६'मध्ये धक्कादायक एविक्शन झालं. नॉमिनेट असलेल्या सात सदस्यांपैकी रुचिता जामदारला 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर पडावं लागलं. रुचिताचा गेम गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलाच बिघडला होता.

'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर रुचिताने मागितली प्रेक्षकांची माफी, म्हणाली- "मी चुकीच्या गोष्टी केल्या... "
काल 'बिग बॉस मराठी ६'मध्ये धक्कादायक एविक्शन झालं. नॉमिनेट असलेल्या सात सदस्यांपैकी रुचिता जामदारला 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर पडावं लागलं. रुचिताचा गेम गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलाच बिघडला होता. रितेश देशमुख तिला वारंवार भाऊचा धक्क्यावर समजावत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून रुचिता फक्त विशालभोवतीच दिसत होती. परिणामी, कमी वोट्स मिळाल्याने रुचिताला घराबाहेर पडावं लागलं. रुचिताने घराबाहेर आल्यावर पोस्ट लिहून प्रेक्षकांची माफी मागितली.
रुचिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सांगितलं की, ''बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्या बद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्या बद्दल खूप खूप आभार !''
अशाप्रकारे रुचिताने सर्वांची माफी मागितली. एकूणच घराबाहेर आल्यावर रुचिताला तिची चूक उमगली असल्याचं दिसतंय. रुचिता खेळात आणि बोलण्यात चांगली होती. पण गेल्या काही आठवड्यांपासून विशालच्या प्रेमात असल्याने रुचिताचा गेम पूर्णपणे बिघडला होता. ती घरात अनेकदा सदस्यांसोबत भांडताना दिसली. पण तरीही रुचिता शेवटपर्यंत टिकून राहील अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. परंतु तिला घराबाहेर जावं लागलं.