"माझा साखरपुडा झालाय पण.."; यजुवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यानच RJ महावशचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:09 IST2025-04-04T13:07:14+5:302025-04-04T13:09:17+5:30
यजुवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान आरजे महावशचा मोठा खुलासा. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत (

"माझा साखरपुडा झालाय पण.."; यजुवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यानच RJ महावशचा मोठा खुलासा
गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल (yuzvendra chahal) आणि आरजे महावश (rj mahavash) यांच्या डेटिंगच्या बातम्या मीडियामध्ये सुरु आहेत. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान यजुवेंद्र आणि महावश एकमेकांसोबत दिसले. तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी शिजतंय, अशा चर्चांना उधाण आलं. चहल किंवा महावश या दोघांपैकी कोणीही अजून अधिकृतरित्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नाही. अशातच महावशने एका मुलाखतीत एक खुलासा केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली आरजे महावश जाणून घ्या.
आरजे महावशचा साखरपुडा झाला होता पण...
एका मुलाखतीत आरजे महावशने तिच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल जे काही प्रश्न सध्या उठत आहेत त्याबद्दल खुलासा केला. महावश म्हणाली की, "सध्या मी सिंगल आहे. मला जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हाच मी डेटिंगचा विचार करेन. फक्त कॅज्युअल रिलेशनशीपवर तिला विश्वास नाही. सध्या तरी मी लग्नाचा प्लान थांबवला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर नवीन नात्याशी स्वतःला जोडून घेण्यात मला काहीही रस नाही. माझा वयाच्या १९ व्या वर्षी साखरपुडा झाला होता. परंतु ते नातं फार काळ टिकलं नाही. २ वर्षांनंतर आमचं नातं संपलं."
"मी अलीगढसारख्या भागातून येते. लग्न करुन मुलींनी घर सांभाळावं, अशी पारंपरिक मानसिकता तिथे आहे. याच गोष्टीला जीवनाचं अंतिम ध्येय समजलं जातं", अशाप्रकारे आरजे महावशने लग्न आणि रिलेशनशीपच्या प्रश्नांवर मौन सोडलंय. क्रिकेटच्या सामन्यात जेव्हापासून आरजे महावशला चहलसोबत पाहण्यात आलंय तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत असं बोललं जातंय. पार्टी आणि इव्हेंटमध्येही दोघं एकत्र दिसले. "परंतु मी सध्या सिंगल आहे", असा खुलासा आरजे महावशने केला आहे.