शेवंता इज बॅक! तोच तोरा, तोच नखरेबाजपणा, कृतिकाचा शेतातील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 16:45 IST2024-05-31T16:45:00+5:302024-05-31T16:45:00+5:30
Krutika tulaskar: कृतिका कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिच्या जीवनातील लहामोठे किस्से, घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करते.

शेवंता इज बॅक! तोच तोरा, तोच नखरेबाजपणा, कृतिकाचा शेतातील व्हिडीओ व्हायरल
कृतिका तुळसकर (Krutika tulaskar) हे नाव मराठी प्रेक्षक वर्गाला फारसं नवीन नाही. रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या मालिकेत कृतिकाने शेवंता ही भूमिका साकारली होती. कृतिका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर केला आहे.
कृतिका कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिच्या जीवनातील लहामोठे किस्से, घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. खास फोटोशूटच्या निमित्ताने तिने हा व्हिडीओशूट केल्याचं लक्षात येतं.
कृतिकाने छान गावात जाऊन तेथील एका शेतात व्हिडीओशूट केलं आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. गडद हिरव्या रंगाची साडी तिने नेसली असून त्यावर हलकासा मेकअप आणि साधी हेअर स्टाइल केली आहे.
दरम्यान, तिचा हा लूक नेटकऱ्यांना भलताच आवडला असून सोशल मीडियावर सध्या तिच्या लूकची चर्चा होतीये. कृतिका मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अल्पावधीत लोकप्रियता मिळवणाऱ्या कृतिकाने 'रात्रीस खेळ चाले' यापूर्वी 'विजेता', 'बबन', 'बेनवाड' सारख्या सिनेमात काम केलं आहे.