'हमारे राम आए हैं...', रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर व्हायरल झाले नवीन गाणे, पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:33 IST2024-01-22T16:32:48+5:302024-01-22T16:33:40+5:30
Humare Ram Aye Hai: 'रामायण' मालिकेतील अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांचे नवीन गाणे रिलीज.

'हमारे राम आए हैं...', रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर व्हायरल झाले नवीन गाणे, पाहा Video...
Ram Mandir Ayodhya : आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पाचशे वर्षांचा वनवास भोगल्यानंतर अयोध्यापती भगवान श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देशात आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्यासोबतच 'राम आयेंगे' हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्यावर अनेक रील्स बनवण्यात येत आहे.
दरम्यान, रामललाच्या अभिषेकानंतर सोशल मीडियावर आणखी एक गाणेदेखील रिलीज झाले आहे. या गाण्यात टीव्ही शो 'रामायण' मध्ये भगवान श्रीरामची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल, माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया, आणि लक्ष्मणची भूमिका करणारे सुनील लाहिरी एकत्र दिसत आहेत.
Video:-
'हमारे राम आये हैं' हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे गाणे पाहून नेटकरी खूप भावूक होत आहेत. आत्तापर्यंत हे गाणे 6 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. लोक यावर विविध कमेंट करत आहेत, व्हिडिओवर जय श्री रामचा नाराही देत आहेत.
या गाण्याचे शूटिंग 22 जानेवारीपूर्वी अयोध्येत पूर्ण झाले होते, ज्यासाठी अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी खूप आधी अयोध्येत पोहोचले होते. हे गाणे रिलीज झाल्यानंतर अरुण गोविल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरुन या गाण्याविषयी माहिती दिली.