वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत असलेल्या 'या' चिमुकल्याला ओळखलं का? 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतोय महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 19:44 IST2022-04-11T19:43:08+5:302022-04-11T19:44:53+5:30
Parth Ghatge: गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी आपले स्वत:चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत असलेल्या 'या' चिमुकल्याला ओळखलं का? 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतोय महत्त्वपूर्ण भूमिका
सध्या सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे वा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करण्याचा एका नवा ट्रेंड सुरु झाला आहे.त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यात खासकरुन प्रत्येक सेलिब्रिटीच्या फोटोला विशेष लोकप्रियता मिळत आहे. यामध्येच सध्या एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने वेगवेगळ्या पोझ दिल्या असून त्याच्या बालपणीचा हा निरागस फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी आपले स्वत:चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मात्र, यावेळी एका अभिनेत्याच्या वडिलांनी चक्क त्याच्या बालपणीचे फोटो पोस्ट केले आहे. विशेष म्हणजे फोटोत दिसणारा हा अवखळ लहान मुलगा आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. इतकंच नाही तर सध्या तो राजा रानीची गं जोडी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता पार्थ घाडगे आहे. पार्थ सध्या राजा रानीची गं जोडी या मालिकेत सुजितराव ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे स्मार्ट लुकिंग आणि मस्तीखोर अंदाज यामुळे पार्थ अल्पावधीत लोकप्रिय झाला. खासकरुन तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे.