इक्यावनमध्ये साकारली जाणार प्रियांका चोप्राची मेरी कॉम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:38 IST2017-12-21T08:08:39+5:302017-12-21T13:38:39+5:30

इक्यावनमध्ये दोन्ही प्रमुख कलाकार सुशील प्राची टेहलान आणि सत्या नमिष तनेजा यांच्यात बॉक्सिंग मॅच पाहायला मिळणार आहे. प्राची यात ...

Priyanka Chopra's Mary Comedy | इक्यावनमध्ये साकारली जाणार प्रियांका चोप्राची मेरी कॉम

इक्यावनमध्ये साकारली जाणार प्रियांका चोप्राची मेरी कॉम

्यावनमध्ये दोन्ही प्रमुख कलाकार सुशील प्राची टेहलान आणि सत्या नमिष तनेजा यांच्यात बॉक्सिंग मॅच पाहायला मिळणार आहे. प्राची यात सुशीलची टॉमबॉयिश भूमिका करत असून सत्यासोबत आणखी एका स्पर्धेमध्ये उतरण्याबद्दल ती अतिशय उत्साहात आहे. आगामी एपिसोडमध्ये सुशील लोकप्रिय चित्रपट मेरी कॉममधील बॉक्सिंग दृश्यासारखे दृश्य साकारताना दिसणार आहे. यात ती प्रियांका चोप्रासारख्यात रूपात दिसणार असून तिच्यासारखाच कॉस्च्यूम आणि मेकअप परिधान करणार आहे. प्रियांका चोप्रासारखी भूमिका साकारण्याबद्दल अतिशय उत्साहात असलेली प्राची म्हणाली, “प्रियांका मला प्रेरणा देते आणि मला तिच्याबद्दल खूप आदर आहे. मी तिची मोठी चाहती असून माझ्या शोमध्ये मला तिच्यासारखी भूमिका साकारायला मिळणे हा माझ्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहे.

Also Read:‘ऑनस्क्रीन’ आजी आणि नातवाची ‘रिअल’ केमिस्ट्री

दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. असंच काहीसं नातं छोट्या पडद्यावरील इक्यावन मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळते. यापैकी या मालिकेतील आजी आणि नातवाचे नाते अनोखे असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत आजी लीलाची भूमिका अभिनेत्री कविता वैद्य साकारत आहेत. तर त्यांच्या नातवाच्या म्हणजेच सत्याच्या भूमिकेत नमिष तनेजा पाहायला मिळतो आहे.नमिष तनेजासोनत कविता वैद यांची केमिस्ट्री सध्या रसिकांना चांगलीच भावते आहे. या दोघांचे ऑनस्क्रीन आजी आणि नातवाचं नातं रसिकांना भावतं आहे.दोघांमधील नातं हे रिअल आजी आणि नातवासारखंच आहे. इक्यावन या मालिकेत दोघंही रसिकांना भावतायत.

Web Title: Priyanka Chopra's Mary Comedy