लोकप्रिय टीव्ही कपलचं ब्रेकअप? सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो; चाहतेही निराश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 17:19 IST2025-03-16T17:18:30+5:302025-03-16T17:19:50+5:30
बिग बॉसमध्ये भेटलेल्या या जोडीच्या लव्हस्टोरीचा दी एन्ड झाला?

लोकप्रिय टीव्ही कपलचं ब्रेकअप? सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो; चाहतेही निराश
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि नेहमी चर्चेत असलेलं कपल अंकिता गुप्ता (Ankita Gupta) आणि प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) यांचं ब्रेकअप झालं आहे. सोशल मीडियावर या जोडीची खूप लोकप्रियता होती. त्यांना 'प्रियांकित' हे नावंही दिलं गेलं होतं. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. दोघांनी एकमेकांना अनफॉलोही केलं आहे. बिग बॉसमध्ये भेटलेल्या या जोडीच्या लव्हस्टोरीचा दी एन्ड?
प्रियंका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता या जोडीचे अनेक चाहते आहेत. बिग बॉस १६ मध्ये दोघंही सहभागी झाले होते. इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. नंतर दोघंही अनेक ठिकाणी सोबत दिसायचे. मात्र त्यांनी कधीच नात्याची कबुली दिली नव्हती. बिग बॉसआधी त्यांनी 'उडारियाँ' मालिकेत एकत्र काम केलं होतं. नंतर बिग बॉसमध्ये गेल्यावर त्यांची जवळीक वाढली. काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा सुरु होत्या. आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
प्रियंका-अंकितच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहतेही निराश झाले आहेत. दोघांनी कधीच रिलेशनशिप ऑफिशियल केली नव्हती. मात्र त्यांचे एकत्र फोटो, रील्स पाहून सर्वांनाच हिंट मिळायची. लग्नाच्या चर्चांदरम्यान दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि आपण एकमेकांशिवायच जास्त खूश राहू असा निर्णय त्यांनी घेतला. अद्याप ब्रेकअपवर दोघांनी अधिकृत भाष्य केलेलं नाही.