Prem Sagar Passes Away: 'रामायण' मालिकेचे कॅमेरामन, दिग्दर्शक प्रेम रामानंद सागर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:56 IST2025-08-31T14:52:11+5:302025-08-31T14:56:18+5:30

Prem Sagar Passes Away: 'रामायण' मालिकेचे कॅमेरामन, दिग्दर्शक प्रेम रामानंद सागर यांचं निधन

prem sagar son of legendary filmmaker producer ramanand sagar passes away in mumbai | Prem Sagar Passes Away: 'रामायण' मालिकेचे कॅमेरामन, दिग्दर्शक प्रेम रामानंद सागर यांचं निधन

Prem Sagar Passes Away: 'रामायण' मालिकेचे कॅमेरामन, दिग्दर्शक प्रेम रामानंद सागर यांचं निधन

Prem Sagar Death: मनोरंजन विश्वातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. 'रामायण' या पौराणिक मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे सुपूत्र प्रेम सागर यांचं निधन झालं आहे. आज रविवारी, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज दुपारी ३ वाजता मुंबईतील जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती मिळते आहे.

एक उत्तम दिग्दर्शक तसेच छायाचित्रणकार अशी प्रेम सागर यांनी इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या वडिलांचा दिग्दर्शनाचा वारसा पुढे नेला. प्रेम यांनी सागर आर्ट्स बॅनरखाली बराच काळ काम केले. हे प्रॉडक्शन हाऊस त्याचे वडील रामानंद सागर यांनी सुरू केलं होतं. त्यांचं कलाविश्वातील योगदान फार मोठं आहे. पडद्यामागे राहून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे.

८०-९०च्या दशकातील रामायण ही दूरदर्शनवरील मालिका प्रचंड गाजली होती.रामानंद सागर यांच्या सागर आर्ट्स निर्मित "रामायण " त्यावेळी प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली. रविवार सकाळी ही मालिका प्रक्षेपित होत असताना रस्त्यावर शुकशुकाट दिसून येई. रामानंद सागर यांच्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.तर या मालिकेत राम,लक्ष्मण आणि सीतेच्या भूमिकेत असलेल्या अरुण गोविल, दीपिका चिखलीया यांना लोकप्रियता मिळवून दिली.आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांची छबी कायम आहे.

Web Title: prem sagar son of legendary filmmaker producer ramanand sagar passes away in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.