प्रसाद ओकची आर्थिक परिस्थिती बिकट; म्हणाला, 'आधी माझ्याकडे खूप पैसे होते पण आता...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:20 IST2023-03-14T13:18:38+5:302023-03-14T13:20:43+5:30
प्रसादने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.

प्रसाद ओकची आर्थिक परिस्थिती बिकट; म्हणाला, 'आधी माझ्याकडे खूप पैसे होते पण आता...'
मराठी निर्माता, अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नेहमी बायकोसोबतचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत तो भन्नाट कॅप्शन देत असतो. त्याच्या काही कॉमेडी रिल्सने तर चाहते खळखळून हसतात. त्याने नुकतेच पोस्ट केलेले एक रिल तुफान व्हायरल होत आहे. सर्व लग्न झालेल्या पुरुषांची व्यथाच त्याने मांडली आहे.
प्रसादने इन्स्टाग्रामवर रिल (Instagram Reel) शेअर केलं आहे. हे कॉमेडी रील आहे. यामध्ये तो म्हणतो, 'आधी माझ्याकडे खूप पैसे होते. पण नंतर माझं लग्न झालं...संपली गोष्ट.' रीलच्या शेवटी प्रसादचा चेहरा अगदी केविलवाणा होतो. 'गोष्ट कशी वाटली?' असं कॅप्शन देत त्याने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.
प्रसादचं हे रील चाहत्यांना भलतंच आवडलंय. तमाम पुरुष वर्गाची व्यथाच त्याने रील मधून मांडली आहे. यावर प्रसादची बायको मंजिरीनेही (Manjiri Oak) हसतानाचे इमोजी कमेंट केले आहेत. चाहत्यांनीही यावरस भन्नाट कमेंट केल्या आहेत. 'सगळे पैसे वारले' असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर 'सर म्हणून पार्टी देत नाहीए का तुम्ही' असं एकाने प्रसादला विचारलं आहे.
प्रसाद सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो मध्ये जज आहे. तर लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. याशिवाय प्रसाद 'धर्मवीर २' मध्येही आनंद दिघेंच्या भूमिकेत दिसणार आहे.