प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 15:36 IST2023-11-19T15:35:44+5:302023-11-19T15:36:41+5:30
Prasad jawade: प्रसादने गळ्यात घातलेलं लॉकेट अमृताच्या आई-बाबांनी त्याला गिफ्ट केलं आहे.

प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट
'बिग बॉस मराठी'मुळे (bigg boss marathi) लोकप्रिय झालेली जोडी अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade) ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मोठ्या थाटामाटात या जोडीचा लग्न सोहळा पार पडला. अमृता-प्रसादच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. इतकंच नाही तर हा लग्नसोहळा अनेक कारणांसाठी गाजला. त्यातलंच एक कारण म्हणजे प्रसादने लग्न लागताच गळ्यात घातलेलं लॉकेट.
प्रसाद आणि अमृता यांच्या मेहंदी सोहळ्यापासून ते सप्तपदीपर्यंत प्रत्येक विधी, कार्यक्रम नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहिला. यात खासकरुन प्रसादने घातलेल्या लॉकेटची चर्चा रंगली आहे. लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी गळ्यात मंगळसूत्र घालते. मात्र, यावेळी, प्रसादने अमृतासह त्याच्या गळ्यातही अमृताच्या नावाचं लॉकेट घातलं. त्याच्या लॉकेटचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लग्नाचे विधी सुरु असताना प्रसादने अमृताला मंगळसूत्र घातलं. त्यानंतर त्याने त्याच्याही गळ्यात अमृताच्या नावाचं लॉकेट घातलं. विशेष म्हणजे असं करत प्रसादने तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान, प्रसादने गळ्यात घातलेलं लॉकेट अमृताच्या आई-बाबांनी त्याला गिफ्ट केलं आहे. विशेष म्हणजे प्रसादने त्याच्या हातावरही हटके मेहंदी काढली होती. ‘अमृतमय जाहलो' असं लिहित त्याने हातावर मेहंदी काढली आहे.