1704! हे काय नवीन? प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो, 'पुण्यात घेतलंय...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 15:38 IST2023-07-02T15:36:39+5:302023-07-02T15:38:04+5:30

प्राजक्ताने आणखी एक गुडन्यूज शेअर केली आहे.

prajakta mali marathi actress bought new flat in pune shared nameplate photo | 1704! हे काय नवीन? प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो, 'पुण्यात घेतलंय...'

1704! हे काय नवीन? प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो, 'पुण्यात घेतलंय...'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात सूत्रसंचालनाचा ठसा उमटवणारी सर्वांची लाडकी प्राजू सध्या नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचं करिअर तर जोरात आहेच शिवाय 'प्राजक्तराज' हा पारंपारिक दागिन्यांचा व्यवसायही तिने सुरु केलाय. त्यालाही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर आता प्राजक्ताने आणखी एक गुडन्यूज शेअर केली आहे. तिने पुण्यात घर खरेदी केलं असून सोशल मीडियावर नेमप्लेटही शेअर केली आहे.

प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मूळची पुण्याचीच आहे. शूटिंगनिमित्त ती मुंबईत असते. आपलं करिअर सांभाळत ती आपल्या कुटुंबाच्याही जवळ असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक छानसा फोटो स्टोरी मध्ये पोस्ट केलाय. काळ्या दगडाच्या प्रतिकृतीवर सोनेरी अक्षरात इंग्रजीमध्ये प्राजक्ता माळी असं लिहिलं आहे. तर खाली 1704 हा क्रमांक लिहिला आहे. मध्ये फुलांचं चित्र आहे. प्राजक्ताचा हा फोटो बरंच सांगून जाणारा आहे. तो नंबर म्हणजे तिचा फ्लॅट क्रमांक असल्याचं माध्यम रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलंय.

प्राजक्ताने पुण्यात तिच्या स्वप्नातील घर खरेदी केलं असून तितकीच सुंदर नेमप्लेटही बनवली आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला. मात्र लगेच काही तिला घराचा ताबा मिळणार नाही. त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. प्राजक्ताच्या या यशावर तिचे चाहतेही खूश झालेत. 

वर्कफ्रंटबद्दल...

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमधील तिच्या लूकची बऱ्याचदा चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं तर प्राजक्ता शेवटची लकडाउन चित्रपटात पाहायला मिळाली होती.

Web Title: prajakta mali marathi actress bought new flat in pune shared nameplate photo