'प्राजक्त'राज ला २ महिने पूर्ण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'आपली संस्कृती...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:39 IST2023-03-06T16:38:45+5:302023-03-06T16:39:54+5:30

अभिनय, सूत्रसंचालन अशा अनेक भूमिकांमधून ती चाहत्यांसमोर येते.

prajakta mali actress own startup prajaktaraj completed 2 months | 'प्राजक्त'राज ला २ महिने पूर्ण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'आपली संस्कृती...'

'प्राजक्त'राज ला २ महिने पूर्ण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'आपली संस्कृती...'

मराठमोळी अभिनेत्री आणि अनेकांची क्रश प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. अभिनय, सूत्रसंचालन अशा अनेक भूमिकांमधून ती चाहत्यांसमोर येते. मात्र प्राजक्ताची केवळ हीच आवड नसून ती एक व्यावसायिकाही आहे. आपल्या मराठमोळ्या पारंपारिक दागिन्यांना वाव देण्यासाठी तिने 'प्राजक्तराज' (Prajaktaraj) हा दागिन्यांचा ब्रॅंड सुरु केला. 'प्राजक्तराज'ला आज दोन महिने पूर्ण झाल्याबद्दल प्राजक्ताने पोस्ट शेअर केली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने 'प्राजक्तराज' ब्रॅंडची सुरुवात केली होती. या ब्रॅंडच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: आले होते. प्राजक्तासाठी हा फारच खास क्षण होता. तिने या ब्रॅंडच्या माध्यमातून सोनसळा, म्हाळसा, तुळजा या अलंकारांचा समावेश केला आहे. २ महिने पूर्ण झाल्यानिमित्त प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 

“प्राजक्तराज” पर्वाला सुरू होऊन आज २ महिने झाले. आपली संस्कृती जपली जातेय, व्यवसाय क्षेत्रात पदार्पण झालय, तुमच्या प्रेमाची पावतीही मिळतीए…; त्यामुळे सुख-समाधान मिळतय.
खूप धन्यवाद..
असेच पाठीशी रहा…

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या सूत्रसंचालनात व्यस्त आहे. शिवाय ती सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते आणि चाहत्यांना अपडेट्स देत असते. प्राजक्ताला सध्या लग्नाबाबत प्रश्न विचारला जातोय. मात्र प्राजू इतक्यात काही लग्न करण्याच्या तयारित दिसत नाही.

Web Title: prajakta mali actress own startup prajaktaraj completed 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.