घटस्फोटावर काही बोलणार का? पापाराझींचा धनश्रीला प्रश्न; स्माईल करत म्हणाली, "आधी माझं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 09:39 IST2025-03-22T09:37:06+5:302025-03-22T09:39:02+5:30
घटस्फोटावर काही बोलणार का? पापाराझींनी धनश्रीला अचानक विचारला प्रश्न

घटस्फोटावर काही बोलणार का? पापाराझींचा धनश्रीला प्रश्न; स्माईल करत म्हणाली, "आधी माझं..."
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma)पापाराझींनी धनश्रीला विचारला घटस्फोटावर प्रश्न, स्माईल करत म्हणाली... यांचा दोन दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची अंतिम सुनावणी झाली. दरम्यान धनश्रीचं नुकतंच एका गाणं रिलीज झालं आहे. 'देखा जी देखा मैने' असं गाण्याचं टायटल आहे. गाण्यात तिचं टॉक्झिक रिलेशनशिप दाखवण्यात आलं आहे. तिचा नवरा तिच्यावर हात उगारतो. यामध्ये धनश्रीचा डान्स परफॉर्मन्सही आहे. दरम्यान घटस्फोटानंतर पहिल्यांदाच धनश्री कॅमेऱ्यासमोर आली. तेव्हा तिला पापाराझींनी थेट घटस्फोटावरच प्रश्न विचारला.
काय म्हणाली धनश्री?
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच धनश्री एका इव्हेंटमध्ये आली. तिने कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. यावेळी पापाराझींनी तिला 'कालच्या गोष्टीबद्दल (घटस्फोटाबद्दल) काही बोलणार का?' असा प्रश्न विचारला. यावर तिने 'नाही'अशी मान डोलावली. नंतर ती म्हणाली, 'आधी तुम्ही माझं गाणं ऐका. आता लगेच ऐका.' यानंतर पापाराझी म्हणाला, 'गाणं सध्या ट्रेंडिंगवर आहे. तुमच्या खऱ्या आयुष्यातील परिस्थितीसोबत मॅच होतंय'. यावर धनश्रीने फक्त स्माईल दिली आणि थंब दाखवला.
धनश्रीला किती मिळाली पोटगी?
युजवेंद्र आणि धनश्रीने २०२० साली लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ४ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. आश्चर्य म्हणजे दोघंही अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यांनी उच्च न्यायालयातून जाऊन कुलिंग पिरियड रद्द करण्याची परवानगी मिळवली आणि दुसऱ्याच दिवशी बांद्रा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट फायनल केला. युजवेंद्रने धनश्रीला ४.७५ कोटी रुपयांची पोटगी दिल्याचीही चर्चा आहे.
वर्कफ्रंट
युजवेंद्र आता आयपीएलमध्ये खेळणार आहे. तसंच सध्या त्याचं नाव आर जे महावशसोबत जोडलं जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलला दोघांनी स्टेडियममध्ये एकत्र बसून मॅचचा आनंद घेतला होता. तर दुसरीकडे धनश्री तिच्या करिअरवर लक्ष देत आहे.