सर्वांना हसवणारा पॅडी लेकींच्या कुशीत रडला! मुलींची घरात एन्ट्री होताच अभिनेत्याचे अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:43 IST2024-09-27T17:41:49+5:302024-09-27T17:43:40+5:30
पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळेंच्या मुलीची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झालीय (bigg boss marathi 5, paddy kamble)

सर्वांना हसवणारा पॅडी लेकींच्या कुशीत रडला! मुलींची घरात एन्ट्री होताच अभिनेत्याचे अश्रू अनावर
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे कुटुंब त्यांना भेटायला येत आहेत. बिग बॉसच्या घरातले सर्व सदस्य कुटुंंबियांना पाहून इमोशनल झालेले पाहायला मिळत आहेत. काल बिग बॉसच्या घरात चार सदस्यांची फॅमिली येऊन गेली. आज उर्वरीत चार सदस्यांची फॅमिली भेटायला येणार आहे. त्यापैकी पॅडी या नावाने लोकप्रिय असलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता पंढरीनाथ कांबळेच्या मुलींची घरात एन्ट्री होणार आहे.
मुलींना पाहताच भावुक झाला पॅडी
बिग बॉस मराठीच्या प्रोमोत पाहायला मिळतंय की, पंढरीनाथ, अंकिता गार्डन एरियात बसलेले असतात. त्यावेळी बिग बॉस म्हणतात की, "या घराने एका विनोदवीराला इथे हसताना, इतरांना हसवताना पाहिलं. पण आता हे घर बघणार आहे या विनोदवीराला मनसोक्त जगताना. कारण घरात येत आहेत त्यांच्या आयुष्यातल्या त्या दोन." पुढे दरवाजा उघडला जातो आणि पॅडीच्या लेकींची घरात एन्ट्री होते. पंढरीनाथ फ्रीज असल्याने तो काहीच हालचाल न करता लेकींना बघताच ढसाढसा रडताना दिसतो.
पंढरीनाथ कांबळेंना अश्रू अनावर
पुढे पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडीच्या दोन्ही मुली बाबाला पाहतात. दोघीही पॅडीला मिठी मारतात. पुढे बिग बॉस पॅडीला रिलीज करतात. पंढरीनाथ लेकींना मिठी मारत मनसोक्त रडताना दिसतो. दोन्ही मुली बाबाला मिठी मारत त्याला धीर देतात. अशाप्रकारे बिग बॉसच्या घरात पंढरीनाथ रडताना दिसतो. आता बाबाला लेकी काय सांगणार? पंढरीनाथचा गेम त्याच्या मुलींना कसा वाटतोय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात मिळतील.