​आता छोट्या पडद्यावरची ही प्रसिद्ध जोडी दिसणार बिग बॉसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 09:38 AM2017-09-29T09:38:11+5:302017-09-29T15:08:11+5:30

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला हितेन तेजवानी लवकरच प्रेक्षकांना एका रिअॅलिटी शो मध्ये पाहायला ...

Now, this big pair of small screen will be seen in Big Boss | ​आता छोट्या पडद्यावरची ही प्रसिद्ध जोडी दिसणार बिग बॉसमध्ये

​आता छोट्या पडद्यावरची ही प्रसिद्ध जोडी दिसणार बिग बॉसमध्ये

googlenewsNext
योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला हितेन तेजवानी लवकरच प्रेक्षकांना एका रिअॅलिटी शो मध्ये पाहायला मिळणार आहे. हितेनने क्योंकी प्रमाणेच कुटुंब, पवित्र रिश्ता, कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. कुटुंब या मालिकेत गौरी प्रधानने त्याच्या नायिकेची भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी या मालिकेनंतर २००४ मध्ये लग्न केले. त्या दोघांना दोन जुळी मुले देखील आहेत. डर सबको लगता है या कार्यक्रमात नुकताच हितेन प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता तर गौरी सध्या तू आशिकी या मालिकेत झळकत आहे. 
गौरी आणि हितेनने अनेक मालिकांमध्ये एकत्र काम करण्यासोबतच नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील ते एकत्र झळकले होते. आता ते पुन्हा एकदा रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉसमध्ये आतापर्यंत अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. शिल्पा सकलानी आणि अपूर्व सकलानी या पती-पत्नीच्या जोडीने देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. एखादी जोडी कार्यक्रमात असली की कार्यक्रमाला अधिक तडका मिळतो आणि टीआरपी चांगलाच वाढतो असे म्हटले जाते. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये गौरी आणि हितेनला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारण्यात आले आहे. त्यामुळे गौरी आणि हितेन दोघेही कार्यक्रमात झळकणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता गौरी आणि हितेनपैकी केवळ हितेनच बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. कारण गौरी सध्या तू आशिकी या कलर्स वाहिनीवरील मालिकेमध्ये काम करत आहे. त्यामुळे या मालिकेच्या चित्रीकरणातून तिला ब्रेक मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह असल्याने गौरी बिग बॉसमध्ये सहभागी होणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही. पण हितेन या कार्यक्रमात भाग घेणार असल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलाच आनंद होणार आहे यात काही शंकाच नाही आणि त्यात जर गौरी देखील बिग बॉसच्या घरात झळकली तर त्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. 

hiten tejwani gauri pradhan

Also Read : बिग बॉसमधील कॉन्ट्रोव्हर्शल स्पर्धक

Web Title: Now, this big pair of small screen will be seen in Big Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.