अर्जुनला नवरदेवाच्या पेहरावात बघून नेहा रमली स्वप्नरंजनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 19:52 IST2016-11-26T19:51:18+5:302016-11-26T19:52:33+5:30

‘परदेस मे है मेरा दिल’ मालिकेतील राघव मेहराची व्यक्तिरेखा साकारणारा अर्जुन बिजलानीला आॅनस्क्रिन विवाहासाठी अचानक सज्ज व्हावे लागल्याने मालिकेत ...

Neha looks at the idol of Arjun | अर्जुनला नवरदेवाच्या पेहरावात बघून नेहा रमली स्वप्नरंजनात

अर्जुनला नवरदेवाच्या पेहरावात बघून नेहा रमली स्वप्नरंजनात

रदेस मे है मेरा दिल’ मालिकेतील राघव मेहराची व्यक्तिरेखा साकारणारा अर्जुन बिजलानीला आॅनस्क्रिन विवाहासाठी अचानक सज्ज व्हावे लागल्याने मालिकेत ट्विस्ट निर्माण झाला आहे. मात्र या आॅनस्क्रिन लग्नात त्याला नवरदेवाच्या पेहरावात त्याची रियल लाइप पार्टनर नेहा स्वामी स्वप्नरंजनात रमली आहे.  
मालिकेत नैना आणि राघव यांचे ऐनवेळी लग्न ठरते. नैनाचा नियोजित वर वीर (लक्ष लालवाणी) हा लग्नापूर्वीच घर सोडून पळून जातो. त्यामुळे मेहरा घराण्याची अब्रू वाचविण्यासाठी अर्जुन नैनाशी लग्न करतो. 

या लग्नाच्या प्रसंगातील धावपळीत अर्जुनच्या मदतीला एक खास व्यक्ती आल होती. ती दुसरीतिसरी कोणी नसून त्याची वास्तव जीवनातील पत्नी नेहा स्वामी होती. अर्जुनला पुन्हा एकदा वराच्या पोशाखात पाहून नेहाला तिच्या लग्नाचा प्रसंग आठवला आणि ती स्मरणरंजनात रमली. 

यासंदर्भात अर्जुनने सांगितले की, हा लग्नसोहळ्याचा भाग पाहण्यासाठी नेहा स्वत: सेटवर आली होती. मला पुन्हा वराच्या पेहरावात पाहून तिला इतका आनंद झाला की तिच्या डोळ्यात पाणीच तरळले. आतापर्यंतचे आमचे सहजीवन हा एक सुरेख प्रवास असून, आमच्या लग्नाच्या दिवसांची आठवण काढणं ही आमच्यासाठी एक आनंददायक गोष्ट आहे. आम्ही ते दिवस मनात जपून ठेवले आहेत. अर्जुन-नेहा टीव्ही उद्योगातील एक अतिशय लाडके जोडपे आहे. 

Web Title: Neha looks at the idol of Arjun