'मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या..'; महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर सचिन गोस्वामींची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 17:13 IST2023-07-02T17:12:19+5:302023-07-02T17:13:03+5:30
Sachin goswami: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक सचिन गोस्वामी यांनीदेखील एका पोस्टमधून त्यांचे विचार मांडले आहेत.

'मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या..'; महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर सचिन गोस्वामींची पोस्ट
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज ( २ जुलै) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजकीय भूकंप केला आहे. त्यांच्या या शपथविधीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नाही तर यामुळे राज्यातील राजकारमाला नवी कलाटणी मिळाली आहे. सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत याच विषयाची चर्चा आहे. यामध्येच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक सचिन गोस्वामी ( sachin goswami) यांनीदेखील एका पोस्टमधून त्यांचे विचार मांडले आहेत.
सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी त्यांचं मत मांडलं आहे. "महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट..भा ज पा,राष्ट्रवादी, शिवसेना आणि भा ज पा तील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार... (मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या आईचा घो....)", अशी पोस्ट सचिन यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठा बंड केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार यांनी आज शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.