राजीव निगमने घेतली राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता प्रकाशराजची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 14:37 IST2018-02-26T09:07:42+5:302018-02-26T14:37:42+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही राजकीय परिस्थितीवर विडंबनात्मक भाष्य करणारी आगामी विनोदी मालिका यंदाची सर्वात ...

National Award-winning actor Prakashraj, gifted by Rajiv Nigam | राजीव निगमने घेतली राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता प्रकाशराजची भेट

राजीव निगमने घेतली राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता प्रकाशराजची भेट

्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही राजकीय परिस्थितीवर विडंबनात्मक भाष्य करणारी आगामी विनोदी मालिका यंदाची सर्वात बहुप्रतीक्षित मालिका बनत चालली आहे. अशा प्रकारची ‘स्टार प्लस’वरील ही पहिलीच मालिका आहे.विद्यमान राजकीय परिस्थितीवर नर्म विनोदी शैलीत टीका करणारी ही मालिका प्रेक्षकांना गुदगुल्या करणार आहे.अलीकडेच या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट राजकीय नेत्याची प्रमुख भूमिका रंगविणारे अभिनेते आणि विनोदवीर राजीव निगम यांनी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता प्रकाशराज याची एका कार्यक्रमात भेट घेतली.या भेटीसंदर्भात राजीव निगम म्हणाले, “प्रकाशराजची भेट घेण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.ते अतिशय नम्र आणि सौजन्यशील आहेत. त्यांची राजकारणावरची समज पाहून मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्यामुळेच ही मालिका म्हणजे माझ्या दृष्टीने एक शिक्षणाची संधीच ठरेल, असं मला वाटलं.राजकारण कसं चालतं, हे जाणून घेण्यास मला या मालिकेमुळे उपयोग होईल आणि त्यामुळे मला माझ्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय देता येईल.”‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही मालिका म्हणजे भ्रष्ट नेत्याच्या जीवनावरील उपहात्मक भाष्य असून अशा त-हेची ‘स्टार प्लस’वरील ही पहिलीच मालिका आहे. ठेंगा पार्टीचा नेता असलेल्या चैतूलाल या भ्रष्ट नेत्याच्या दृष्टीने आपले खिसे भरणं हे सर्वात प्राधान्याचं काम असून देशाचं हित हे सर्वात शेवटी येतं. त्याला मुख्यमंत्रीपदाची निवडणूक जिंकायची असते आणि त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्याची तयारी असते.

टीव्हीवरील राजकीय विडंबनाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे आपल्याच चुकांवर हसण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे.‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही आगामी मालिका देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य सादर करणार आहे.राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’या कार्यक्रमातील एक लोकप्रिय उमेदवार राजीव निगम हे या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची भूमिका रंगविणार आहेत.टीव्हीवर राजकीय नेत्याची भूमिका रंगविण्यास उत्सुक झालेले राजीव निगम म्हणाले, “एक नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा मी नेहमीच आदर करतो. राजकीय उपहास हे माझं कार्यक्षेत्र असल्याने मला वाजपेयी यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. मी त्यांची भाषणं नेहमीच ऐकत आलो असून त्यांची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला आहे.त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द प्रशंसनीय असून त्यांनी भारताला स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्र बाळगण्याचं समर्थन केलं होतं.तसंच आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी अनेक सुधारणा केल्या.आश्वासनं देऊन आपल्या कार्यकाळातच ती प्रत्यक्षात उतरविणार्‍या मोजक्या नेत्यांमध्ये वाजपेयी यांचा समावेश होतो.”प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यावर राजीव निगम यांचा भर असून त्यासाठी राजकीय उपहास हे माध्यम त्यांनी निवडले आहे.या भ्रष्ट नेत्यांच्या दृष्टीने आपले खिसे भरणं हे सर्वात प्राधान्याचं काम असून देशाचं हित हे सर्वात शेवटी येतं.आपल्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नसल्याचे सांगून राजीव निगम म्हणाले की तरीही राजकीय विडंबनातून देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती विनोदी पध्दतीने सादर करणे हे आपले ध्येय आहे.

Web Title: National Award-winning actor Prakashraj, gifted by Rajiv Nigam