'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या गाण्यावर नम्रता संभेराव बनवत होती रील, भिंतीवर जाऊन आपटली अन् मग...; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:01 IST2025-12-16T17:58:54+5:302025-12-16T18:01:21+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावनेदेखील अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे.

'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या गाण्यावर नम्रता संभेराव बनवत होती रील, भिंतीवर जाऊन आपटली अन् मग...; पाहा व्हिडीओ
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. फक्त बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर सोशल मीडियावरही 'धुरंधर'ची चर्चा होत आहे. या सिनेमातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' सिनेमातील FA9LA या गाण्यालाही पसंती मिळाली आहे. या गाण्यावरचे रील्स तुफान व्हायरल झाले आहेत. अनेक कलाकारांना अक्षय खन्नाच्या या गाण्यावर रील व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावनेदेखील अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये नम्रतासोबत प्रथमेश शिवलकर दिसत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी कलाकारांची तयारीही सुरू आहे. यादरम्यानच नम्रता आणि प्रथमेशने मजेशीर रील बनवला आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला ते नाचताना दिसत आहेत. त्यानंतर नम्रता बाजूच्या भिंतीवर जाऊन आपटते. आणि मग स्वत:चं हसायला लागते. "महाराष्ट्राची हास्यजत्रा चं शूट सुरु झालंय madness तर झालाच पाहिजे", असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा रील व्हिडीओ शेअर केला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मराठी टेलिव्हिजनवरील अतिशय लाडका शो आहे. या शोने अनेक कलाकारांना टॅलेंट दाखवण्याची संधी दिली. आता याचा नवा सीझन सुरू होत आहे. ५ जानेवारीपासून प्रेक्षकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा सीझन सोनी मराठीवर पाहता येणार आहे.