दिवाळीनिमित्त शशांक केतकरने पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो, मुलगी दिसायला खूपच गोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 08:56 IST2025-10-24T08:47:23+5:302025-10-24T08:56:07+5:30
शशांक केतकरने दिवाळीचं औचित्य साधून पहिल्यांदाच त्याच्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर केला आहे. त्याची लेक दिसायला खूप क्यूट आहे. बघा फोटो

दिवाळीनिमित्त शशांक केतकरने पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो, मुलगी दिसायला खूपच गोड
शशांक केतकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. शशांकला आपण विविध सिनेमा आणि मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून शशांक केतकर घराघरात पोहोचला. पुढे 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' आणि आता 'मुरांबा' या मालिकेतून शशांक प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनला आहे. दरम्यान दिवाळीनिमित्त शशांक केतकरने पहिल्यांदाच त्याच्या मुलीचा आणि मुलाचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. शशांकने शेअर केलेल्या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शशांकने पहिल्यांदा रिव्हिल केला दोन्ही मुलांचा चेहरा
शशांक केतकरने सोशल मीडियावर त्याचा मुलगा ऋग्वेद आणि लेक राधाचा फोटो शेअर केला आहे. आनंदाचे झाड दारी झुलते डहाळी… असं कॅप्शन देत शशांकने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शशांक, त्याची पत्नी प्रियंका हिच्यासह हा फोटो पोस्ट केला असून त्यात ऋग्वेद आणि राधा दिसत आहेत. शशांक गेले अनेक महिने मुलांचा फोटो पोस्ट करतोय, पण त्याने कधीच त्यांचा चेहरा दाखवला नव्हता. पण आता दिवाळीचं औचित्य साधून शशांकने हे खास फोटो शेअर केले आहेत. शशाकंने फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
''खूप छान आणि गोड कुटुंब आहे या कुटुंबाला कोणाची नजर ना लागो'', ''किती गोड कुटुंब'', ''किती गोड, खुप छान family members मस्तच... गोड राधा शशांक कार्बन कॉपी आणि ऋग्वेद दादा प्रियांकाची कार्बन कॉपी'', अशा कमेंट करत लोकांनी शशांक केतकर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. शशांकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो सध्या 'मुरांबा' मालिकेत झळकत आहे. याशिवाय रंगभूमीवर लवकरच तो नवीन नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.