​मुन्ना भाईला मिळाला हा नवीन सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 16:05 IST2018-04-18T10:35:06+5:302018-04-18T16:05:06+5:30

मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले होते. या दोन्ही चित्रपटात प्रेक्षकांना ...

Munna Bhaiya got the new circuit | ​मुन्ना भाईला मिळाला हा नवीन सर्किट

​मुन्ना भाईला मिळाला हा नवीन सर्किट

न्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले होते. या दोन्ही चित्रपटात प्रेक्षकांना मुन्ना आणि सर्किट यांची अनोखी जोडी पाहायला मिळाली होती. या चित्रपटांमध्ये संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी अनुक्रमे मुन्ना आणि सर्किट यांची भूमिका साकारली होती. या दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. मुन्नाभाई सिरिजमधील पुढचा चित्रपट कधी येणार आणि या चित्रपटात मुन्ना आणि सर्किटची केमिस्ट्री प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार याची ते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. आता हे सर्किट आणि मुन्ना एक वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
कलर्सने त्याच्या लोकप्रिय एन्टरटेनमेंट की रात @9 या शोच्या पुनरागमनाची जय्यत तयारी केली आहे , टेलिव्हिजन हॉटीज सौम्या टंडन आणि नेहा पेंडसे या सीझनच्या बँडवॅगन मध्ये सामील होणार असून विनोदवीर मुबिन सौदागर, बलराज व बालकलाकार दिव्यांश या दुसऱ्या आवृत्तीत सुद्धा प्रेक्षकांना गुदगुल्या करून हसवणार आहेत. 
हा नवीन सीझन बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तच्या सोबत सुरू होणार असून संजू बाबा नवीन सर्किटसोबत त्यांच्या प्रसिद्ध बाईक वरून शो मध्ये प्रवेश करणार आहेत. हा नवीन सर्किट कोण असेल बरे? तो दुसरा कोणी नसून मुबिन सौदागर आहे. 
संजयच्या गाजलेल्या मुन्ना भाई एमबीबीएस या सिनेमाला ट्रिब्यूट म्हणून सर्किट सारखा ड्रेस घालून मुबिनने अर्शदची नक्कल केली. मुबिन सोबत मंचावर आल्यावर संजू बाबा अतिशय खूश झाला होता. मुबिनच्या टॅलेंटने आणि सर्किट, गोविंदा आणि त्याच्या स्वतःच्या नकलेने हा सुपरस्टार अतिशय प्रभावित झाला होता. मुबिन आणि संजय दत्त नायक नही खलनायक हूँ मैं या गाण्यावर थिरकताना देखील प्रेक्षकांना दिसणार आहेत. या विषयी बोलताना मुबिनने सांगितले, “ मला संजय दत्त अतिशय आवडतात आणि त्यांच्या सोबत मंचावर एंट्री करणे हा माझ्यासाठी अतिशय अविस्मरणीय क्षण होता. ते अतिशय खेळकर आहेत आणि शो वर त्यांचा सर्किट बनणे अतिशय गंमतीदार होते.”

Also Read : २१ वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर दिसणार संजय दत्त- माधुरी दीक्षितची जोडी! वरूण धवन-आलिया भट्टही दिसणार सोबत

Web Title: Munna Bhaiya got the new circuit