विवाहित असलेल्या मुनव्वर फारुकीला आहे एक मुलगा; LockUpp मध्ये सत्य आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:19 IST2022-04-11T17:18:39+5:302022-04-11T17:19:48+5:30
कंगनाने मुनव्वरला काही प्रश्न विचारत एक फोटो दाखवला. हा फोटो पाहिल्यावर मुनव्वरने प्रथम त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर कंगनाने सगळ्यांसमोर या फोटोचं सत्य सांगितलं.

विवाहित असलेल्या मुनव्वर फारुकीला आहे एक मुलगा; LockUpp मध्ये सत्य आलं समोर
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणाऱ्या कंगना रणौतचा (kangana ranaut) लॉकअप (LockUpp) हा शो सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. या शोमध्ये वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी त्यांच्या जीवनातील अनेक गुपितं जाहीरपणे सांगत आहेत. यामध्येच आता लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (munawar faruqui) याच्याविषयी एक मोठा गोप्यस्फोट झाला आहे.
लॉकअपमध्ये २२ वर्षाच्या अंजलीसोबत फ्लर्ट करणाऱ्या मुनव्वरचं यापूर्वी लग्न झालं असून त्याला एक मुलगादेखील असल्याचं सत्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्याचं हे सत्य ऐखल्यानंतर शोमधील स्पर्धकांसह प्रेक्षकही थक्क झाले आहेत.
अलिकडेच झालेल्या एका भागत कंगनाने मुनव्वरविषयी त्याला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं देत असताना मी विवाहित असल्याचा खुलासा त्याने केला. इतकंच नाही तर त्याला एक मुलगा असून पत्नी आणि मुलामुळेच या शोमध्ये सहभागी झालो असंही त्याने सांगितलं.
दरम्यान, कंगनाने मुनव्वरला काही प्रश्न विचारत एक फोटो दाखवला. हा फोटो पाहिल्यावर मुनव्वरने प्रथम त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर कंगनाने सगळ्यांसमोर या फोटोचं सत्य सांगितलं. ऐकल्यावर फोटोत दिसणारी स्त्री आणि मुलगा माझेच पत्नी, मुलगा असल्याचं त्याने कबूल केलं.
नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या दीड वर्षांपासून मुनव्वर आणि त्याच्या पत्नीचा कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे मुनव्वरने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. परंतु, मुनव्वरचं हे सत्य ऐकल्यानंतर अंजलीला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. कारण, अंजलीने या कार्यक्रमातच मुनव्वरसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली.