'बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा!'; कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा, अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:15 IST2025-09-11T14:14:35+5:302025-09-11T14:15:36+5:30
MNS warns Kapil Sharma : अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा शोबद्दल राग व्यक्त करुन त्यांची तीव्र नाराजी दर्शवली आहे

'बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा!'; कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा, अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' हा सध्या नेटफ्लिक्सवरील चर्चेतला शो. कपिल शर्मा शोला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी, राजकारणी, स्टँड अप कॉमेडियन, राजकीय कवी सहभागी दिसतात. पण आता कपिल शर्मा शो चांगलाच अडचणीत आला आहे. कारण या शोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला आहे. बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी पोस्ट लिहून दिला आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण
कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा
अमेय खोपकर यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मधील एका एपिसोडची क्लीप x वर शेअर केली आहे. या क्लिपमध्ये कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झालेली हुमा कुरेशी मुंबईबद्दल बोलताना बॉम्बे असा उल्लेख करतात.
त्यावर राग व्यक्त करुन अमेय खोपकर लिहितात, ''#BombaytoMumbai बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंतीवजा इशारा देण्यात येत आहे.'' अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी केली आहे.
#BombaytoMumbai
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 11, 2025
बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत… pic.twitter.com/KKa7TazDJ0
अशाप्रकारे अमेय खोपकर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आता यावर कपिल शर्मा काय प्रत्युत्तर देणार का, हे पाहावं लागेल. कपिल शर्मा शोचा तिसरा सीझन सध्या नेटफ्लिक्सवर सुरु झालाय. या शोमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झालेले दिसत आहेत. कपिल शर्मा त्याच्या अफलातून सेन्स ऑफ ह्यूमरने प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. आता मनसेने इशारा दिल्याने कपिल शर्मा कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.