घरातील किचनपासून राष्‍ट्रीय स्‍तरावर प्रसिद्धी;अर्चना धोत्रे यांचं स्‍वप्‍न पूर्ण, लेकीला आईचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:05 IST2026-01-15T15:00:58+5:302026-01-15T15:05:50+5:30

मास्टर शेफ इंडियामध्ये मराठीमोळी जोडी अर्चना धोत्रे आणि रुपाली जाधव सहभागी झाली आहे. कोण आहेत त्या?

master chef india Archana Dhotre and rupali jadhav participate dream comes true | घरातील किचनपासून राष्‍ट्रीय स्‍तरावर प्रसिद्धी;अर्चना धोत्रे यांचं स्‍वप्‍न पूर्ण, लेकीला आईचा अभिमान

घरातील किचनपासून राष्‍ट्रीय स्‍तरावर प्रसिद्धी;अर्चना धोत्रे यांचं स्‍वप्‍न पूर्ण, लेकीला आईचा अभिमान

'मास्‍टरशेफ इंडिया सीझन ९' मधील स्‍पर्धक अर्चना धोत्रे मुंबईचे प्रतिनिधीत्‍व करत रूपाली जाधवसोबत जोडी म्‍हणून स्‍पर्धा करत आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अर्चना गेल्या काही काळापासून व्यवसाय म्हणून स्वयंपाक करत आहेत. त्या आसपास राहणाऱ्या ग्राहकांसाठी टिफिन आणि घरगुती पद्धतीचे जेवण तयार करतात, तसेच सोशल मीडियावर आपल्या पाककृती शेअर करतात. त्‍यांनी फक्‍त आपले पाककला कौशल्‍य दाखवण्‍यासाठी नाही तर स्‍वत:च्‍या जीवनाला कलाटणी देऊन कुटुंबाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्‍याच्‍या ध्येयासह मास्‍टरफेशमध्‍ये सहभाग घेतला. 

अर्चना त्‍यांची मुलगी त्‍यांना टेलिव्हिजनवर पाहत असल्‍याचे सांगितल्‍यानंतर त्या खूप भावूक झाल्‍या. त्‍या म्‍हणाल्‍या, ''मी सोशल मीडिया कूकिंगबाबत अनेक व्हिडिओ पोस्‍ट करायचे. लोकांना ते आवडायचे, शेअर करायचे आणि मला चांगल्‍या कमेंट्स द्यायचे. ज्‍यामुळे मला खूप आनंद होत होता, पण या आनंदापेक्षा त्‍या दिवशी मिळालेला आनंद खूप मोठा होता.''

''टीव्‍हीवर माझा एपिसोड दिसला तेव्‍हा माझ्या मुलीने मला फोन केला आणि म्‍हणाली 'आई, तू टीव्‍हीवर खूप छान दिसत आहेस'. तो माझा खरा विजयी क्षण होता. संपूर्ण जगासाठी हा फक्‍त शो असेल, पण माझ्यासाठी माझ्या मुलीने केलेले कौतुक कोणत्‍याही ट्रॉफीपेक्षा मोठे आहे. माझ्या मुलीला माझ्याकडे पाहून अभिमान वाटला तेव्‍हा मला जीवनात सर्वकाही मिळाल्‍यासारखे वाटले.''


पुढे सांगताना त्‍या भावूक होत म्‍हणाल्‍या, ''माझ्या मुलीने मला सांगितले की, तिच्‍या मैत्रिणीकडून तिच्‍याकडे येऊन म्‍हणाल्‍या 'तुझी आई सेलिब्रिटी आहे'. ती माझ्याकडे धावत आली आणि म्हणाली, 'आई, सर्वजण तुला ओळखतात'. त्‍या क्षणाला मी सर्व तणाव, सर्व मेहनत, थकवून टाकणारे दिवस सर्वकाही विसरून गेले, मला फक्‍त एकच गोष्‍ट जाणवली की मी माझ्या मुलीला तिच्‍या आईचा अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.''

डोळ्यांमध्‍ये अश्रू येण्‍यासह अर्चना पुढे म्‍हणाल्‍या, ''मी या शोमध्‍ये फक्‍त कूकिंग स्‍पर्धेसाठी आले नाही तर माझ्या मुलीला तिची आई देखील मोठे स्‍वप्‍न पाहू शकते हे दाखवून देण्‍यासाठी आले आहे. भविष्‍यात तिला स्‍वप्‍न पाहण्‍याची भिती वाटली तर मला तिला आठवून करून द्यायचे आहे की, एकदा तिची आई संपूर्ण देशासमोर उभी राहिली होती आणि स्‍वत:मधील क्षमतेवर विश्वास ठेवला होता. तो माझा खरा विजय असेल.'' 

सोनी लिव्‍हवरील प्रमुख पाककला बाबतीतला शो 'मास्‍टरशेफ इंडिया' अत्‍यंत प्रभावी नवीन सीझनसह परतला आहे, जो नवीन जोडी संकल्‍पना घेऊन आला आहे. ५ जानेवारीपासून सुरू झालेला हा शो अधिक आवड, अधिक ड्रामा आणि अधिक फ्लेवरची खात्री देतो. पुन्‍हा एकदा एकत्र आलेले शोचे मूळ परीक्षक शेफ विकास खन्‍ना, शेफ रणवीर ब्रार आणि शेफ कुणाल कपूर यांनी शोमध्‍ये आपली स्‍टार पॉवर व लोकप्रियतेची भर केली आहे. हा सीझन भारतातील लहानात लाहन पाककला व वारसा पाककलांवर लक्ष केंद्रित करतो, ज्‍यामध्‍ये मनोरंजनासह सांस्‍कृतिक अभिमानाचे संयोजन आहे. 

Web Title : किचन से प्रसिद्धि तक: अर्चना धोत्रे का मास्टरशेफ सपना, बेटी का अभिमान।

Web Summary : मास्टरशेफ इंडिया की प्रतियोगी अर्चना धोत्रे परिवार के लिए खाना बनाने और अपने पाक कला के सपनों को पूरा करने में संतुलन बनाती हैं। टीवी पर उन्हें देखकर उनकी बेटी का गर्व ही उनकी सबसे बड़ी जीत है। अपनी बेटी को प्रेरित करने के लिए भाग लेकर, वह उसे दिखाना चाहती है कि महिलाएं बड़े सपने हासिल कर सकती हैं।

Web Title : From Kitchen to Fame: Archana Dhotre's MasterChef Dream, Daughter's Pride.

Web Summary : Archana Dhotre, a MasterChef India contestant, balances cooking for her family and pursuing her culinary dreams. Her daughter's pride in seeing her on TV is her biggest win. Participating to inspire her daughter, she aims to show her that women can achieve big dreams.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.