‘सुकिश’ने शेअर केली लग्नपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 19:59 IST2016-11-26T19:59:15+5:302016-11-26T19:59:15+5:30

सध्या टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुयश राय आणि किश्वर मर्चेंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगत आहे. १६ डिसेंबर रोजी होत असलेल्या ...

Marriage magazine shared with 'Sukish' | ‘सुकिश’ने शेअर केली लग्नपत्रिका

‘सुकिश’ने शेअर केली लग्नपत्रिका

्या टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुयश राय आणि किश्वर मर्चेंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगत आहे. १६ डिसेंबर रोजी होत असलेल्या या लग्न समारंभासाठी दोघेही जोरदार तयारी करीत असून, नुकतेच त्यांनी लग्नपत्रिका ट्विटरवर शेअर केली आहे. 

लग्नपत्रिका अतिशय खास पद्धतीने डिझाइन केलेली आहे. या कार्डवर ‘आॅफिशियली सुकिश’ असे लिहले आहे. याचा अर्थ दोघेही त्यांच्या फॅन्सला सांगत आहेत की, ते लवकरच आॅफिशियली पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे. सुयशने ही पत्रिका त्याच्या अकाउंटवरून ट्विटरवर शेअर केली असून, त्याखाली आता केवळ २३ दिवसच शिल्लक राहिले असल्याचे लिहले आहे. सुयश आणि किश्वर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. आता ते विवाहबंधना अडकणार आहेत. लग्नानंतर हनीमुनसाठी दोघेही पॅरिसला जाण्याची तयारी करीत आहेत. 

बिग बॉसच्या नवव्या सीजनमध्ये दोघेही सहभागी झाले होते. त्यावेळी दोघांमधील प्रेम चांगलेच बहरले होते. शोमध्येच त्यांनी आम्ही लग्न करणार असल्याचेही स्पष्ट केले होते. शोमध्ये किश्वर एक स्ट्राँग स्पर्धक होती. त्यामुळे तिच्यावर बºयाचदा ती सुयशला सोडचिठ्ठी देईल असे आरोप केले जात होते. मात्र या लव्हबर्डसवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. 

Web Title: Marriage magazine shared with 'Sukish'