बिग बॉसच्या घरात पुन्हा राडे; मासे खरेदी करण्यावरुन सोनाली-विकासमध्ये भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:05 IST2021-11-23T16:02:33+5:302021-11-23T16:05:13+5:30
Bigg boss marathi: बिग बॉसच्या घरात आज मासळी बाजार हा नवा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये घरातील काही सदस्य माशांची विक्री करणार आहेत.

बिग बॉसच्या घरात पुन्हा राडे; मासे खरेदी करण्यावरुन सोनाली-विकासमध्ये भांडण
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त म्हणून कायम चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून दररोज नवनवीन टास्क घरात रंगत आहेत. नुकतंच या घरात नॉमिनेशन एक्स्प्रेस हे कार्य पार पडलं. त्यानंतर आता मासळी बाजार हा नवा टास्क रंगणार आहे. मात्र, या टास्कमध्येही दरवेळीप्रमाणे घरात राडे होणार आहेत.
बिग बॉसच्या घरात आज मासळी बाजार हा नवा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये घरातील काही सदस्य माशांची विक्री करणार आहेत. मात्र, या सदस्यांनी माशांचे जे भाव लावले आहेत. त्यावरुन सोनाली आणि विकासमध्ये वाद होणार आहे.
घरात रंगत असलेल्या टास्कमध्ये विकास माशांची विक्री करत आहे. यावेळी सोनाली त्याच्या दुकानात मासे खरेदी करायला जाते. त्यावर एका टोपलीची किंमत ८ हजार रुपये असल्याचं विकास सांगतो. मात्र, ८ हजाराचे कधी मासे असतात का त्यापेक्षा ३ हजारात सगळे मासे द्या असं सोनाली सांगते. परंतु, ८ वरुन डायरेक्ट ३ हजार इतका कमी भाव परवडत नाही असं विकास म्हणतो.
दरम्यान, या माशाच्या किंमतीवरुन दोघांमध्ये वाद होतो. हे नुसते कागद नाही याला किंमत आहे... काय डायरेक्ट जेट्टीवरून माल उचलला आहे का ? अशी शाब्दिक चकमक दोघांमध्ये होते. परंतु, अखेर हा मासा नेमका कितीला विकला जातो ते आजच्या मासळी बाजार या टास्कमध्येच प्रेक्षकांना कळणार आहे.