यंदाच्या रंगपंचमीला नेहा-यश उधळणार प्रेमाचे रंग; फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 22:26 IST2022-03-14T22:24:42+5:302022-03-14T22:26:22+5:30
Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर नेहा आणि यशचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये नेहा आणि यश पहिल्यांदाच एकत्रपणे होळे साजरी करणार आहेत.

यंदाच्या रंगपंचमीला नेहा-यश उधळणार प्रेमाचे रंग; फोटो होतायेत व्हायरल
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील यश,नेहा आणि परी ही तिकडी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. त्यातच दिवसेंदिवस मालिकेत येणारं रंजकदार वळणंही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यातच आता या मालिकेत सध्या लव्ह ट्रॅक दाखवण्यात येत आहे. नेहा आणि यशच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर यंदाच्या रंगपंचमीच्या दिवशी ही जोडी रंगासोबतच प्रेमाचीही उधळण करणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर नेहा आणि यशचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये नेहा आणि यश पहिल्यांदाच एकत्रपणे होळे साजरी करणार आहेत. त्यामुळे या मालिकेत आता प्रेक्षकांना होळी, धुलिवंदन हे सण साजरे होतांना पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नेहाने यशसमोर प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर या दोघांच्या प्रेमाचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र, या लग्नासाठी परीला तयार करणं आणि आजोबांची समजूत काढणं ही दोन मोठी आव्हानं यश-नेहा समोर आहेत. त्यामुळे या आव्हानांना ते कसं सामोरं जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.