'ठुमक- ठुमक' गाण्यावर रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसोबत जबरदस्त डान्स! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले-"एकच नंबर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:44 IST2025-09-19T13:39:44+5:302025-09-19T13:44:41+5:30
'ट्रेंडिंग गाण्यावर रेश्मा शिंदेने ऑनस्क्रीन जाऊबाईसोबत धरला ठेका! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

'ठुमक- ठुमक' गाण्यावर रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसोबत जबरदस्त डान्स! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले-"एकच नंबर..."
Reshma Shinde: हल्ली सोशल मिडियावर एखादं गाणं व्हायरल झालं कि त्यावर रिल्स, डान्स व्हिडीओ बनवण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. समाजमाध्यमांवर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपली कला सादर करताना दिसतात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसिद्ध गायिका नेहा भसीनच्या जुती मेरी या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवल्या असून सोशल मीडियावर या गाण्याने अनेकांना वेड लावलं आहे.दरम्यान,आता या ट्रेंडिंग गाण्यावर घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील रेश्मा शिंदे आणि ऋतुजा कुलकर्णी या नायिकांना डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यातील त्यांचे हावभाव आणि एक्सप्रेशन्स पाहून नेटकरी भरभरुन कौतुक करत आहेत.
घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. याच मालिकेतील जानकी म्हणजे रेश्मा शिंदेने तिची ऑनस्क्रिन जाऊबाई अवंतिकासोबत ठुमक ठुमक गाण्यावर ताल धरला आहे. सोशल मीडियावर त्यांचा सुंदर डान्स व्हिडीओ शेअर करत या दोघींनी चाहत्याचं लक्ष वेधलं आहे. कोल्हापूरी कोलॅब असं कॅप्शन देत अमृता धोंगडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ठुमक ठुमक अजूनही ट्रेंडमधून बाहेर पडलेलं नाही... असं कॅप्शन देत रेश्माने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर रेश्मा-ऋतुजाचा हा डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांची पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट्स करत म्हटलंय, "फूल ऑन ठुमक ठुमक... तर आणखी एका चाहत्यांने प्रतिक्रिया देत लिहिलंय, तुम्ही दोघीही खूप छान दिसताय... अशी कमेंट त्याने केली आहे.
सध्या मालिकेत सध्या ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा सीक्वेंस सुरु आहे.ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी जानकीचा प्लॅन यशस्वी होईल की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.