पत्नीच्या तालावर नाचणार अविनाश नारकर? ऐश्वर्या यांचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 16:00 IST2024-03-29T16:00:00+5:302024-03-29T16:00:00+5:30
Aishwarya narkar: सध्या सोशल मीडियावर या एव्हरग्रीन जोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पत्नीच्या तालावर नाचणार अविनाश नारकर? ऐश्वर्या यांचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क
ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) आणि अविनाश नारकर (avinash narkar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. कलाविश्वात सक्रीय असलेली ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम ते नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. परंतु, यावेळी ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहत्यांनी भुवया उंचावल्या आहेत.
ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत अविनाश नारकर दिसत असून या जोडीने व्हायरल ट्रेंड फॉलो केला आहे.
'तालावर नाचवतो दुनियेला, तिच्या तालावर नाचतो मी...' या भन्नाट गाण्यावर या जोडीने रील केलं आहे. सोबतच 'unconditional love' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, आतापर्यंत या जोडीने अनेक ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स केले आहेत. इतकंच नाही तर त्यांचे रील्स सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतात.