'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याने घेतला मरणोत्तर देहदानाचा निर्णय; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:25 IST2025-05-21T10:22:21+5:302025-05-21T10:25:42+5:30
पत्नीच्या वाढदिवसानिमित्त टीव्ही अभिनेत्याने घेतला मरणोत्तर देहदानाचा निर्णय, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याने घेतला मरणोत्तर देहदानाचा निर्णय; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Ankur Wadhave: झी मराठी वाहनीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची आजही प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. या कार्यक्रमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे हे कलाकार घराघरात पोहोचले. त्यातील एक नाव म्हणजे अंकुर वाढवे (Ankur Wadhave). कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत अंकुरने देखील आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अंकुरने आपले अभिनय कौशल्य नेहमीच सिद्ध केलं आहे. त्याच्या याच अभिनयाचे अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही कौतुक केलं आहे. अशातच नुकतीच अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
अंकुर वाढवने काल २० मे रोजी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याच्या पत्नीसह मरणोत्तप अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती देत त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अंकुरने त्यामध्ये असं लिहिलंय की, "निमित्त बायकोच्या वाढदिवसाचं! आम्ही दोघांनीही आज जेजे हॉस्पिटल मधे मरणोत्तर “अवयवदान आणि देहदान” संकल्प केला आहे. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या आमच्या इच्छेला पूर्णरूप देण्यासाठी डॉ. रेवत कानिंदे चे आभार!" अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे.
अंकुर वाढवेने सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टवर अनेक कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्याच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत या निर्णयाची प्रशंसा केली आहे.
वर्कफ्रंट
अंकुर वाढवेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अगदी कमी वेळेत अंकुर चाहत्यांच्या पसंतीस उतरला. अंकुर वाढवे हा जसा एक चांगला अभिनेता आहे, तसाच तो एक उत्तम कवीही आहे. 'चला हवा येऊ द्या' या तसेच 'सर्किट हाऊस', 'कन्हैया', 'आम्ही सारे फर्स्ट क्लास', 'गाढवाचं लग्न', 'निम्मा शिम्मा राक्षस', 'करून गेलो गाव' आणि 'वासुची सासू' या नाटकांमध्ये त्याने काम केलं आहे.