"नांदा सौख्यभरे...!" लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रची अंकिता-कुणालसाठी खास पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:32 IST2025-02-17T15:23:35+5:302025-02-17T15:32:50+5:30

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी होऊन कोकणकन्या अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) घराघरात पोहोचली.

marathi singer savaniee ravindrra shared special post for ankita walawalkar and kunal bhagat on social media | "नांदा सौख्यभरे...!" लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रची अंकिता-कुणालसाठी खास पोस्ट, म्हणाली...

"नांदा सौख्यभरे...!" लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रची अंकिता-कुणालसाठी खास पोस्ट, म्हणाली...

Savaniee Ravindra Post: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी होऊन कोकणकन्या अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) घराघरात पोहोचली. या कार्यक्रमाने तिला वेगळीच ओळख मिळवून दिली. अंकिता वालावलकरच्या घरी सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, १३ फेब्रुवारीपासून तिच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. अंकिताचा काल मेहंदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आज तिचा साखरपुडा पारंपरिक पद्धतीने पार पडला. आता मोठ्या थाटामाटात कोकणातील देवबाग येथे अंकिता व कुणालचा विवाहसोहळा राजेशाही थाटात व पारंपरिक पद्धतीने पार पडला. अंकिता कुणालने अखेर प्रेक्षकांच्या लाडक्या अंकिताने आता वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अंकिता व कुणाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.अशातच अंकिता-कुणालसाठी लोकप्रिय मराठी गायिका सावनी रविंद्रने खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


दरम्यान, या जोडप्यासाठी सावनी रविंद्रने सोशल मीडियावर अंकिता-कुणालच्या लग्नातील सुंदर फोटो पोस्ट करत म्हटलंय, "नांदा सौख्यभरे...! तुम्ही दोघंही आयुष्यभर सुखी आणि आनंदात राहा..., लव्ह यू डार्लिंग्स, सुखी राहा." अंकिता आणि कुणालच्या लग्नात कुटुंबीय व काही मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. पॅडी कांबळे, धनंजय पोवार आणि निखिल दामले वैभव चव्हाण तसेच लोकप्रिय गायिका सावनी रविंद्र देखील उपस्थित होती. 

अंकिता-कुणालच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. मोठ्या दिमाखात त्यांनी लग्न केलं. दरम्यान, अंकिताने आपल्या लग्नात पिवळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, मुंडावळ्या, गळ्यात मोठा नेकलेस घालून तिने लूक केला होता.  तर, विवाहसोहळ्यात 'कोकण हार्टेड गर्ल'चा नवरा कुणाल भगतने सुद्धा लग्नात मराठमोळा लूक केला होता. 

कोण आहे अंकिताचा नवरा?

अंकिताच्या होणार्‍या नवऱ्याचं पूर्ण नाव कुणाल भगत आहे. तो लोकप्रिय संगीतकार आहे. बऱ्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांचं शीर्षकगीत त्याने संगीतबद्ध केली आहेत.

Web Title: marathi singer savaniee ravindrra shared special post for ankita walawalkar and kunal bhagat on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.