मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 15:00 IST2024-06-19T14:59:59+5:302024-06-19T15:00:40+5:30

Shivani rangole: सध्या सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.

marathi actress shivani rangole and hrishikesh shelar follow pushpa 2 movie song angarose | मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स

मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स

सोशल मीडियावर कोणताही ट्रेंड व्हायरल झाला की कलाकार मंडळी तो लगेच फॉलो करतात. यात ऐश्वर्या नारकर, अश्विनी कासार, सोनाली पाटील यांसारखे अनेक कलाकार आहेत. यामध्येच सध्या नेटकऱ्यांमध्ये तुला शिकवीन चांगला धडा फेम अक्षया आणि अधिपती या जोडीची चर्चा रंगलीये. या जोडीने नुकताच 'अंगारो से' या गाजलेल्या गाण्याचा ट्रेंड फॉलो केला आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये 'पुष्पा 2' या सिनेमातील 'अंगारो से' हे गाणं तुफान ट्रेंड होतंय. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर त्यांचे डान्स व्हिडीओ,रिल्स शेअर केले आहेत. त्यामुळे या गाण्यावर थिरकण्याचा मोह अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार यांनाही आवरला नाही.  या दोघांनी मालिकेच्या सेटवर या गाण्यावर भन्नाट डान्स केला.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवानी आणि हृषिकेश या जोडीने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. मात्र, त्यांची जोडी अल्पावधीत लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत लव्ह ट्रॅक सुरु आहे. अलिकडेच अक्षराने अधिपतीसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

Web Title: marathi actress shivani rangole and hrishikesh shelar follow pushpa 2 movie song angarose