सिंपल लूकमध्ये शिवालीने जिंकली नेटकऱ्यांची मनं; 'सलोना सा सजन हैं' म्हणत शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 13:41 IST2024-04-22T13:40:42+5:302024-04-22T13:41:12+5:30
Shivali parab: गेल्या काही दिवसांपासून शिवाली सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

सिंपल लूकमध्ये शिवालीने जिंकली नेटकऱ्यांची मनं; 'सलोना सा सजन हैं' म्हणत शेअर केला व्हिडीओ
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब( shivali parab). उत्तम अभिनय कौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. रिअॅलिटी शो सोबतच शिवाली काही म्युझिक अल्बममध्येही झळकली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची वरचेवर चर्चा रंगत असते. यामध्येच तिचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे.
शिवाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्ये तिने नुकताच तिचा एक लेटेस्ट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका ब्रँडसाठी शिवालीने फोटोशूट केल्याचं तिच्या या व्हिडीओवरुन दिसून येतं.
'सलोना सा सजण हैं..और..मैं हूँ' या गाण्यावर शिवालीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवाली कमालीची सुंदर दिसत असून तिच्या या पोस्टवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. अलिकडेच शिवालीचं 'मासोली ठुमकेवाली' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.