आणखी एका मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या घरी झालं खास केळवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:13 IST2025-12-08T13:09:09+5:302025-12-08T13:13:06+5:30
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केलं मराठी अभिनेत्रीचं पहिलं केळवण, लवकरच अडकणार लग्नबंधनात

आणखी एका मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या घरी झालं खास केळवण
सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु आहे. प्राजक्ता गायकवाज, पूजा बिरारी, भाग्यश्री न्हालवे यांच्यानंतर आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या कलाकार जोडीने या अभिनेत्रीचं केळवण केलं. या अभिनेत्रीचं नाव आहे रसिका वाखारकर. रसिका वाखारकरचं पहिलं केळवण अशोक-निवेदिता सराफ यांच्या घरी झालं.
अशोक-निवेदिता यांनी केलं रसिकाचं खास केळवण
''माझ्या पहिल्या केळवणासाठी जमली अख्खी टीम अशोक मा.मा., शुभंकरचं नाव घेते भारावून गेले मी...'', असा खास उखाणा रसिकाने घेतला. रसिकाने घेतलेला उखाणा अशोक सराफ यांना इतका आवडला की ते नाचायलाच लागले. निवेदिता सराफ यांनीही तिला चांगलीच दाद दिली. पुढे निवेदिता यांनी रसिकाला ओवाळून तिचं औक्षण केलं. त्यानंतर निवेदिता आणि अशोक यांनी रसिकाला खास साडी दिली. अशोक सराफ यांनी मिश्किल स्वभावात रसिकाविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
अशाप्रकारे रसिकाचं केळवण पार पडलं. या केळवणासाठी 'अशोक मा.मा.' मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. सर्वांनी खास गाणी आणि डान्स केला. अशाप्रकारे रसिकाचं केळवण उत्साहात पार पडलं. रसिकाने काही दिवसांपूर्वी शुभंकर उंब्रानीसोबत साखरपुडा केला होता. रसिका आणि शुभंकर येत्या काही दिवसात लग्न करण्याची शक्यता आहे. रसिकाच्या लग्नाची तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे.