वीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, "दोन वर्षांपूर्वी ही मूर्ती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 16:27 IST2024-02-26T16:27:01+5:302024-02-26T16:27:55+5:30
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'नथुराम गोडसे' या नाटकात तिने देखील भूमिका साकारली आहे.

वीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, "दोन वर्षांपूर्वी ही मूर्ती..."
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेने (Radhika Deshpande) एक खास फोटो शेअर करत वीर सावरकरांविषयी आदर व्यक्त केला आहे. राधिकाच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा चर्चेत असतात. ती सामाजिक विषयावर रोखठोकपणे आपले मत मांडते. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'नथुराम गोडसे' या नाटकात तिने देखील भूमिका साकारली आहे. आता राधिकाची वीर सावरकरांविषयीची पोस्टही लक्ष वेधून घेत आहे.
राधिकाच्या घरी वीर सावरकर यांची एक मूर्ती आहे. मूर्तीचा फोटो शेअर करत तिने लिहिले, "दोन वर्षांपूर्वी ही मूर्ती माझ्या घरी आली. कुठली ही गोष्ट मूर्त अथवा अमूर्त स्वरुपात आपल्या घरी येते तेंव्हा त्याच्या मागे काही कारण असतं, कारण जगातली कुठलीच गोष्ट निव्वळ योगायोग म्हणून घडत नसते."
ती पुढे लिहिते, "वीर सावरकर एक विचार आहे आणि तो घराघरात पोहोचतो आहे. सावरकर म्हणजे एक तप, एक व्रत, एक ज्योत. वीर सावरकरांची मूर्ती मी माझ्या अभ्यासाच्या खोलीत ठेवली आहे. तुमच्या घरी त्यांची मूर्ती कुठे ठेवली आहे?"
राधिका देशपांडे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'होणार सून मी या घरची' या लोकप्रिय मालिकेत दिसली होती. यानंतर ती गाजत असलेल्या 'आई कुठे काय करते' मध्येही झळकली. 'स्वराज्य रक्षक संभाजी' मध्येही तिने भूमिका साकारली.