मुलगा झाला हो! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई, एक महिन्यांनी शेअर केली आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:14 IST2026-01-10T09:13:35+5:302026-01-10T09:14:11+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्री आई झाली असून तिने एक महिन्यांनी ही गूड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे

मुलगा झाला हो! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई, एक महिन्यांनी शेअर केली आनंदाची बातमी
मराठी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आई झाली आहे. या अभिनेत्रीचं नाव कुंजिका काळविंट. शुभविवाह मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री कुंजिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आई झाल्याची गुड न्यूज शेअर केली. कुंजिकाला मुलगा झाला असून तिने एक महिन्यांनंतर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
आई झाल्यानंतर कुंजिकाने शेअर केली पोस्ट
कुंजिकाने तिच्या बाळाचा हात घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कुंजिका लिहिते, ''आज बरोबर एक महिन्यापूर्वी आमच्या आयुष्यात एका सुंदर आणि गोड मुलाचे आगमन झाले आणि आमच्या आनंदाला उधाण आले. गेले चार आठवडे झोप न मिळालेल्या रात्री, बाळाला कडेवर घेऊन मारलेल्या गप्पा आणि शब्दांत वर्णन न करता येणारे प्रेम अशा भावनांनी भरलेले होते.''
''पालकत्व हे मााणूस म्हणून नम्र करणारं आहेच शिवाय ते जादुई असून तितकंच ते आव्हानात्मक आणि समाधान देणारंही आहे. आम्ही दररोज काहीतरी नवीन शिकत आहोत, स्वतःमध्ये बदल घडवत आहोत आणि प्रत्येक दिवशी आमच्या चिमुकल्या लेकाच्या अधिक प्रेमात पडत आहोत. आयुष्यातील या नवीन अध्यायासाठी आणि आमच्या कुटुंबाला मिळत असलेल्या प्रेमासाठी व पाठिंब्यासाठी आम्ही अत्यंत ऋणी आहोत.", अशा शब्दात कुंजिकाने आई झाल्यानंतर तिच्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. कुंजिकाने ही पोस्ट लिहिताच 'शुभविवाह' मालिकेतील तिचे सहकलाकार विशाखा सुभेदार आणि इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी तिचं अभिनंदन केलं आहे.