‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं देव दर्शन! पोहोचली भोलेनाथ नगरी उज्जैनला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:21 PM2023-12-13T12:21:28+5:302023-12-13T12:22:51+5:30

लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

marathi actress Jui Gadkari visited Ujjain | ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं देव दर्शन! पोहोचली भोलेनाथ नगरी उज्जैनला

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं देव दर्शन! पोहोचली भोलेनाथची नगरी उज्जैनला

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने एक पोस्ट करत उज्जैनमधील महाकालेश्वराचं दर्शन घेतल्याचे सांगितले. 

जुईने उज्जैनमधील काही फोटोही तिने शेअर केले आहेत. यात ती साडीमध्ये दिसत आहे.  जुईने आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत महाकालेश्वराचं दर्शन घेतले. महाकालेश्वरशिवाय तिने आणखीही काही देवस्थानांना भेट दिली आहे. महाकाल, ओमकारेश्वर, मामलेश्वर, मंगलनाथ, कालभैरव, नवग्रह, सांदीपनी आश्रम, खजराना, राजबाडा, या ठिकाणांना भेट देत जुईनं आशिर्वाद घेतले आहेत.

 तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला असून जुईचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहले, 'तुझ मन खुप सुंदर, निरागस आहे. आणि सुंदर मनाच्या माणसांवर कायम देवाचा आशीर्वाद असतोच'. तर एकाने लिहले, 'आजचा बघितलेला सगळ्यात भारी फोटो आहे हा... अशीच मराठी संस्कृती वाढवा... हर हर महादेव...'. जुईचे हे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहेत. 

 मराठी मालिकाविश्वातील आघाडीची आणि लाडकी सून म्हणून जुई गडकरी ओळखली जाते. तिने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे…’ आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे.  शिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. आजारपणानं खचून न जाता त्याच्या नाकावर टिच्चून  'ठरलं तर मग' या मालिकेमधून तिने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं आहे. 
 

Web Title: marathi actress Jui Gadkari visited Ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.