मालिका संपताच मराठी अभिनेत्रीची लग्नाची लगबग; 'या' दिवशी करणार लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:21 IST2026-01-12T16:19:21+5:302026-01-12T16:21:59+5:30
फॅमिली फंक्शनमध्ये भेट अन् बहरलं नातं! मालिका संपताच मराठी अभिनेत्रीची लगीनघाई,'या' दिवशी घेणार सातफेरे

मालिका संपताच मराठी अभिनेत्रीची लग्नाची लगबग; 'या' दिवशी करणार लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Rasika Wakharkar Wedding: मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, कोमल कुंभार, बिग बॉस फेम सूरज चव्हाण असे टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकार गेल्या काही महिन्यांमध्ये लग्नबंधनात अडकले. तर, काही कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीरपणे कबुली देत लवकरच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यात आता या नवीन वर्षात मालिकाविश्वातील आणखी एक नायिका लग्नगाठ बांधणार आहे.
पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वाखारकर. अलिकडेच रसिका अशोक.मा.मा या मालिकेत काम करताना दिसली.मात्र,नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका संपल्यानंतर आता अभिनेत्री तिच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. काही दिवसांपूर्वीच रसिकाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला होता. त्यानंतर मोठ्या थाटामाटात त्यांचा साखरपुडा पार पडला. आता रसिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या २२-२३ तारखेला ती लग्न करणार असल्याची माहिती मिळते आहे.
सध्या रसिका वाखारकरच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने खास व्हिडीओ शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे."10 days to go...", अशा आशयाचं कॅप्शन तिने देत तिने हा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रसिका तिच्या लग्नाची तयारी करताना दिसते आहे.शिवाय लग्नासाठी दागिने, साड्या खरेदी करत असल्याची या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. रसिकाने या व्हिडीओला #WeddingCountown, #BrideToBe असे हॅशटॅग सुद्धा दिले आहेत.
दरम्यान, राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने तिच्या लग्नाचा किस्सा शेअर केला होता. लग्नाआधी एका फॅमिली फंक्शनमध्ये तिची होणारा नवरा शुभंकर याची भेट झाली होती. तिथेच त्यांचे कॉमन रिलेटिव्हस निघाले. त्यानंतर शुभंकरने त्याच्या आईकडे रसिकाचा नंबर मागितला. तो पहिला फोन कॉल एक-दीड तासाचा होता.एकमेकांना न भेटता फोनवर बोलणं चालू होतं. त्यावेळी शुंभकरने सांगितलं की त्याने रसिकाला मांडवा बीचवर प्रपोज केलं होतं.