हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहेत ऐश्वर्या नारकर; पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले अविनाश नारकरांचे सासू-सासरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 15:49 IST2024-01-12T15:44:20+5:302024-01-12T15:49:10+5:30
Aishwarya narkar: ऐश्वर्या नारकरांच्या आई-वडिलांना पाहिल्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा तुफान पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.

हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहेत ऐश्वर्या नारकर; पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले अविनाश नारकरांचे सासू-सासरे
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar). 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून सध्या त्या दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्या सध्या चर्चेत येत आहेत. विशेष म्हणजे ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टीव्ह आहेत. त्यामुळे त्या योग करतानाचे, डान्सचे, एखादं रील किंवा सेटवरचा भन्नाट व्हिडीओ असं सतत काही ना काही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या व्हिडीओमध्ये त्यांच्या आई-वडिलांची झलक दिसून आली आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या आई-वडिलांसोबत व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या निमित्ताने पहिल्यांदाच चाहत्यांना त्यांच्या आई-वडिलांना पाहता आलं. विशेष म्हणजे ऐश्वर्या यांच्या प्रमाणेच त्यांचे आई-वडील सुद्धा कॅमेरा फ्रेंडली असल्याचं दिसून आलं.
ऐश्वर्या नारकर यांचं खरं नाव माहितीये का? लग्नापूर्वी 'या' नावाने होती त्यांची ओळख
'तुझ्या उपकारा जगी तोड नाही, आई-बाबा', असं कॅप्शन देत ऐश्वर्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहिल्यावर ऐश्वर्या या हुबेहूब आपल्या आईची छबी असल्याचं दिसून येतं. यामध्येच ऐश्वर्या नारकरांच्या आई-वडिलांना पाहिल्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा तुफान पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.