ऐश्वर्या नारकर यांचं खरं नाव माहितीये का? लग्नापूर्वी 'या' नावाने होती त्यांची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 03:32 PM2023-07-04T15:32:37+5:302023-07-04T15:38:03+5:30

Aishwarya narkar:आज कलाविश्वात ऐश्वर्या नारकर या नावाने त्या प्रसिद्ध असल्या तरीदेखील त्यांचं खरं नाव काही वेगळंच आहे.

आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे अगदी विशीच्या तरुणीलाही लाजवेल अशी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम त्यांची चर्चा होत असते.

ऐश्वर्या नारकर यांचा कलाविश्वात दांडगा वावर आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही त्या तितक्याच अॅक्टीव्ह आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी रोज काही ना काही चर्चा रंगत असते.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नावाची चर्चा रंगली आहे.

आज कलाविश्वात ऐश्वर्या नारकर या नावाने त्या प्रसिद्ध असल्या तरीदेखील त्यांचं खरं नाव काही वेगळंच आहे.

अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलेल्या ऐश्वर्या नारकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. विशेष म्हणजे अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी कलाविश्वात स्वत:चं स्थान भक्कम केलं.

ऐश्वर्या नारकर यांचं खरं नाव म्हणजेच लग्नापूर्वीचं नाव पल्लवी अठले असं आहे. त्यांचे बाबा एका बँकेत काम करायचे.

इतकंच नाही तर आज यश, संपत्ती उपभोगत असलेली ही अभिनेत्री एकेकाळी चाळीत रहायची. त्यांचं बालपण सगळं चाळीत गेलं.

ऐश्वर्या नारकर यांनी हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'या सुखांनो या', 'स्वामिनी', 'लेक माझी लाडकी', 'श्रीमंतघरची सून', 'ये प्यार ना होगा कम', 'घर की लक्ष्मी बेटियां' या हिंदी-मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

'तुच माझी भाग्यलक्ष्मी', 'कधी अचानक', 'अंक गणित आनंदाचे' या सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत.