नवरी नटली! 'आई कुठे काय करते' मधील ईशाची लगीनघाई सुरु, 'या' लोकप्रिय अभिनेत्याबरोबर बांधणार लग्नगाठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:43 IST2026-03-06T08:41:00+5:302026-03-06T08:43:11+5:30

लग्नाची लगबग सुरु!'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री खऱ्या आयुष्यात लवकरच करणार लग्न, पारंपरिक विधींना सुरुवात

marathi actress aai kuthe kay karte serial fame apurva gore will marry soon with anshuman joshi rituals started | नवरी नटली! 'आई कुठे काय करते' मधील ईशाची लगीनघाई सुरु, 'या' लोकप्रिय अभिनेत्याबरोबर बांधणार लग्नगाठ 

नवरी नटली! 'आई कुठे काय करते' मधील ईशाची लगीनघाई सुरु, 'या' लोकप्रिय अभिनेत्याबरोबर बांधणार लग्नगाठ 

Apurva Gore Wedding Rituals Begin: गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधली. नुकतीच तुझ्या सोबतीने मालिकेतील अभिनेत्री एतशा संझगिरी लग्नबंधनात अडकली. त्याचबरोबर मुरांबा फेम अभिनेता सिद्धार्थ खिरिडने देखील त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधत सातफेरे घेतले.अशातच या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.



 
या महिन्यात देखील अनेक कलाकार देखील आपल्या जोडीदारोबरोबर लग्नगाठ बांधणार आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अपूर्वा गोरे आणि अंशुमन जोशी. नुकतीच अपूर्वाच्या घरी लग्नविधींना सुरुवात झाली आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या घरी ग्रहमख विधी पार पडला आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने याचे फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय,"ग्रहमखाला काय नेसावं हा पेच कधी नव्हताच… आईच्या लग्नातला ४० वर्ष जुना शालू नेसायचं हे मी ठरवलं होतं… आणि तो नेसल्यावर आईलाही भरुन आलं. ती खूश होती आणि तीला माझं कौतुक ही वाटत होतं हे मला दिसत होतं तिच्या डोळ्यात. हे प्रेम, हा गोडवा आणि हे हळवे क्षण माझ्यासोबत मी कायम जपून ठेवणार आहे हे नक्की." अपूर्वाची ही पोस्ट पाहून चाहत्यांना तिच्या लग्नाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

अलिकडेच काही दिवसांपूर्वीच अपूर्वाने  इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. ‘चाफा आणि तो…. मला खूप आवडतात… #ठरलं’ असे रोमँटिक कॅप्शन देत अपूर्वाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. लवकरच अपूर्वा जोश्यांची सून होणार आहे. 


वर्कफ्रंट 

सध्या अपूर्वा गोरे 'शेवग्याचा शेंगा' या नाटकात काम करत आहे. तिच्यासोबत अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर आहेत. याआधी ती 'आई कुठे काय करते'  मालिकेत ईशाच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. 

अंशुमन जोशी आता काय करतो?

'शाळा'हा सुपरहिट सिनेमा केल्यानंतर अंशुमन मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाला. सध्या तो साउथ सिनेमांमध्ये सक्रीय आहे. अंशुमन पडद्यावर दिसत नसला तरी तो सिनेसृष्टीत कार्यरत आहे. एक अभिनेता असण्यासोबत तो लेखक आणि दिग्दर्शकही आहे.कोकण या युट्यूब सीरिजमध्ये तो दिसला होता. अंशुमनने मल्याळम सिनेमातही काम केलं आहे.२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या थँकम सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा त्याचा पहिला साऊथ सिनेमा होता.

Web Title : 'आई कुठे काय करते' फेम ईशा, अपूर्वा गोरे की शादी की रस्में शुरू!

Web Summary : अपूर्वा गोरे और अंशुमन जोशी शादी के बंधन में बंधने जा रहे हैं। शादी से पहले की रस्में शुरू हो चुकी हैं। अपूर्वा ने अपनी मां की 40 साल पुरानी साड़ी पहनकर तस्वीरें साझा कीं और खुशी व्यक्त की। उन्हें 'आई कुठे काय करते' से प्रसिद्धि मिली।

Web Title : I Kuthe Kay Karte fame Isha, Apurva Gore's wedding rituals begin!

Web Summary : Apurva Gore and Anshuman Joshi are set to marry. Pre-wedding rituals have begun. Apurva shared photos wearing her mother's 40-year-old saree, expressing joy. She gained fame from 'I Kuthe Kay Karte'.