साथिया...! ऐश्वर्या-अविनाशने दिली एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली; रोमॅण्टिक व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 14:16 IST2024-05-26T14:15:55+5:302024-05-26T14:16:20+5:30
Aishwarya and avinash narkar:ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्या सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी रोमॅण्टिक झाल्याचं दिसून येत आहे.

साथिया...! ऐश्वर्या-अविनाशने दिली एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली; रोमॅण्टिक व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) आणि अविनाश नारकर (avinash narkar). उत्तम अभिनयासह ही जोडी त्यांच्यातील एनर्जेटिक स्वभावामुळेही कायम चर्चेत असते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही त्यांचा सक्रीय वावर आहे. त्यामुळे कोणताही नवा ट्रेंड आला की ही जोडी हमखास तो फॉलो करते. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्या सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी रोमॅण्टिक झाल्याचं दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांना तो भलताच आवडला आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश या दोघांनी श्रेया घोषालच्या साथिया या गाण्यावर सुरेख रील केलं आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचं एकमेकांवरचं प्रेम दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी Made for each other असं म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.