"रात्री अचानक आपली गाडी थांबवली जाते, आणि..."; संकर्षण कऱ्हाडेसोबत काय घडलं? पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 10:12 IST2026-03-14T10:11:36+5:302026-03-14T10:12:18+5:30

संकर्षण कऱ्हाडेसोबत एक वेगळाच प्रकार घडला. ज्यामुळे त्याचे चाहते चांगलेच चकीत झाले आहेत. संकर्षणने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याविषयीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली

marathi actor Sankarshan Karahade share post that maharashtra police stopped him middle of the road | "रात्री अचानक आपली गाडी थांबवली जाते, आणि..."; संकर्षण कऱ्हाडेसोबत काय घडलं? पोस्ट चर्चेत

"रात्री अचानक आपली गाडी थांबवली जाते, आणि..."; संकर्षण कऱ्हाडेसोबत काय घडलं? पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर त्याच्या आयुष्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असतो. संकर्षण सध्या मराठी  रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. संकर्षणची सध्या रंगभूमीवर तीन नाटकं सुरु आहेत. अशातच संकर्षण कऱ्हाडेसोबत एक वेगळाच प्रकार घडला. ज्यामुळे त्याचे चाहते चांगलेच चकीत झाले आहेत. संकर्षणने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याविषयीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. काय घडलं नेमकं?

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काही पोलीस अधिकारी संकर्षणच्या आजूबाजूला दिसत आहेत. हे फोटो शेअर करुन संकर्षम लिहितो की, ''रात्री अचानक आपली गाडी थांबवली जाते… काहीही केलं नसतांना ऊगीच मनांत भिती वाटते… आणि पोलिस मामा येऊन म्हणतात “साहेब एक फोटो काढू…” आणि मग खूप गप्पा … खरं सांगू… मला “वर्दीतल्या सेलिब्रिटिंसोबत” फोटो काढायला फार आवडतं… THANK YOU'', अशाप्रकारे संकर्षणच्या आयुष्यात हा खास क्षण घडला आहे.




अशाप्रकारे संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट लिहिली आहे. संकर्षणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, संकर्षणची 'तू म्हणशील तसं', 'कुटुंब कीर्रतन', 'नियम व अटी लागू' ही तीनही नाटकं रंगभूमीवर सुरु आहेत. संकर्षण एका आगामी सिनेमासाठीही काम करतोय. याशिवाय झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या शोचं सूत्रसंचालन संकर्षण करताना दिसतो. एकूणच संकर्षण सध्या रंगभूमीवरील स्टार आहे, असं बोललं जातं.

Web Title : संकर्षण कर्हाडे की गाड़ी रात में रोकी; पुलिस को चाहिए थी फोटो!

Web Summary : मराठी अभिनेता संकर्षण कर्हाडे ने सोशल मीडिया पर एक घटना साझा की जहाँ पुलिस अधिकारियों ने रात में उनकी कार रोकी, लेकिन केवल उनके साथ एक तस्वीर का अनुरोध करने के लिए। उन्होंने खुशी से बात मान ली।

Web Title : Sankarshan Karhade's car stopped at night; police wanted a photo!

Web Summary : Marathi actor Sankarshan Karhade shared an incident on social media where police officers stopped his car at night, but only to request a photo with him. He happily obliged.