"एक अख्खा दिवस हा माणूस…", मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; अनुभव सांगताना म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:14 IST2025-10-04T18:04:35+5:302025-10-04T18:14:26+5:30
"ना कसली किरकिर, ना कसला राग…", मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; म्हणाला...

"एक अख्खा दिवस हा माणूस…", मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; अनुभव सांगताना म्हणाला...
Marathi Actor Post: जॅमी ते महागुरू, 'जंटलमन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटवीर राहुल द्रविडची आजही मोठी क्रेझ आहे. राहुल द्रविडच्या नावाआधी जोडली गेलेली जगप्रसिद्ध उपाधी किंवा विशेषण म्हणजे 'द वॉल'. आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या द्रविडचा प्रवास खरोखरच देदीप्यमान आहे. या महान क्रिकेटरला भेटण्यासाठी त्याचा प्रत्येक चाहता आतुरलेला असतो.अशातच मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्याची राहुल द्रविडला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. या अभिनेत्याचं नाव विशाल साळुंखे आहे.
अभिनेता विपूल साळुंखे हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अलिकडेच स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेत तो पाहायला मिळाला. नुकतीच अभिनेत्याने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर खास पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्या दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला आहे. राहुल द्रविडला भेटल्यानंतर अभिनेता भारावून गेला आहे. दरम्यान, त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय,"गेल्या वर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि यावर्षी मिस्टर डिपेंडबल राहुल द्रविड....aka "दी वॉल" आमच्या "Millennial" जनरेशन मधल्या अनेक जणांसाठी ही केवळ दोन नावं नाहीयेत तर ही आमची "इमोशन्स" आहेत. त्यामुळे फक्त माझ्या जनरेशन मधल्या लोकांनाच माहितीये की आज मी किती आनंदी, अभिमानी आणि भाग्यवान आहे, हे सांगण्यासाठी शब्द अपूरे पडतील. काहींना माझा हेवा वाटेल किंवा काहींना माझा अभिमान असेल.पण तरीही, तुम्हाला ही बातमी सांगताना मला खूप अभिमान वाटतोय की मी अलिकडेच आमच्या स्वतःच्या मिस्टर डिपेंडेबल राहुल द्रविड उर्फ "द वॉल" सोबत एका नवीन जाहिरात चित्रपटासाठी काम केले आहे.एक अख्खा दिवस हा माणूस आमच्या सोबत खरंच एखाद्या भिंती सारखा तटस्थपणे उभा होता."
त्यानंतर पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "ना कसली किरकिर ना कसली चिडचिड ना कसले tantrums न कसला माज... दिसत होतं ते फक्त त्याचं Focused असणं, त्याचं Dedication आणि Hardwork. तेव्हा क्रिकेटच्या ग्राउंड वर पाहायला मिळायचं आणि परवा शूटिंगच्या फ्लोअरवर अगदी प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं.तुम्ही मराठी ॲक्टर म्हणजे तुमचं पण थिएटर बॅकग्राऊंड असणार ना? तुम्ही पण नाटकांमध्ये काम करत असणार ना?" असं अस्खलित मराठीत प्रश्न विचारून स्वतः राहुल द्रविडनेच विषयाला हात घातला आणि मग गप्पांना सुरुवात झाली.नाहीतर मला काय बोलावं कुठून सुरुवात करावी हे ऍक्च्युली सुचत नव्हतं रादर सुधरत नव्हतं, राहुल द्रविड आहे यार तो... अजूनही जॅमीवाला चार्म टिकवून आहे यार हा...., Well honestly speaking राहुल द्रविड सोबत काम करून आलोय यार या ऊपर मी नाही काही बोलू शकत सिरियसली." अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने भावना व्यक्त केल्या आहेत.