'आपल्याकडे अशी सुंदर व्यवस्था..'; पंजाबमधील गुरुद्वारा पाहून भारावून गेले मिलिंद गवळी, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 12:43 PM2024-03-08T12:43:30+5:302024-03-08T12:44:15+5:30

Milind gawali: एका शूटनिमित्त मिलिंद गवळी यांचा पंजाब दौरा झाला. यावेळी त्यांनी येथील गुरुद्वाराला भेट दिली.

marathi-actor-milind-gawali-visit-gurudwara-shri-fatehgarh-sahib-in-punjab-share-experience | 'आपल्याकडे अशी सुंदर व्यवस्था..'; पंजाबमधील गुरुद्वारा पाहून भारावून गेले मिलिंद गवळी, म्हणाले..

'आपल्याकडे अशी सुंदर व्यवस्था..'; पंजाबमधील गुरुद्वारा पाहून भारावून गेले मिलिंद गवळी, म्हणाले..

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. गेल्या कित्येक काळापासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. त्यामुळे त्यातील कलाकार आता प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. यामध्येच मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी आज अनेकांमध्ये लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ते कमालीचे सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. यावेळी ते शुटिंगनिमित्त पंजाबला गेले होते. त्यामुळे येथील अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पंजाबच्या फतेहगड साहेब गुरुद्वाराची झलक दाखवली आहे. सोबतच येथील सुरेख अनुभव शेअर केला आहे.

काय आहे मिलिंद गवळींची पोस्ट?

"काल पटियाला शूटिंगनंतर परत येत असताना हा एक योग आला, फतेहगड साहेब गुरुद्वाराला जाण्याचा. सकाळी पहाटे साडेचार वाजता जेव्हा हॉटेलवरनं निघालो तेव्हा एक रेल्वे क्रॉसिंगला आमची गाडी थांबली होती. त्याच्याच बाजूला हे गुरुद्वारा होतं सुंदर लाइटिंग केलेलं होतं गुरुद्वाराला, अगदी अमृतसरचं गोल्डन टेम्पल सारखं मला ते भासलं. माझ्याबरोबर एक दुसरा मॉडेल पण गाडीमध्ये होता रोहित, आम्ही चौकशी केली तर ड्रायव्हरने सांगितलं की, 24 तास हे गुरुद्वारा चालू असते आणि 24 तास त्या गुरुद्वारामध्ये लंगर चालू असतो. मग मी आणि रोहितने ठरवलं शूटिंग संपल्यानंतर परत येताना आपण या गुरुद्वाराला थांबूया आणि तिथे माथा टेकायचा. ठरल्याप्रमाणे शूटिंग संपल्यावर आम्ही परत येत असताना तिथे थांबलो, माझ्यासाठी हा सुंदर अनुभव होता, याआधी मी नांदेडच्या गुरुद्वारामध्ये जाऊन आलो होतो. त्यावेळेसही मी असाच भारावून गेलो होतो, हे सरदार लोकं आपल्या गुरुद्वारेची खूप काळजी घेतात, अतिशय स्वच्छ ठेवतात, सतत भजन चालू असतं, खूप मनापासून श्रद्धेने, काही गोंधळ न घालता, धक्काबुक्की न करता, अगदी शांतपणे वाहेगुरूंची प्रार्थना करत असतात. (आपल्याकडे अशी सुंदर व्यवस्था शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आहे. शेगावला दोन वेळा जायचा माझा योग आला होता)", असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात,  "एकदा माझी आई वैष्णव देवीला गेली असताना रस्त्यामध्ये दरड कोसळली होती. आणि ती घरी सुखरूप परत आल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं होतं की त्यांच्या मदतीला धावून येणारे सरदार लोकं होती. ती सांगत होती रस्त्यामध्ये दरड कोसळली होती आणि हे सरदार लोकं खूप मदत करत होते, रस्त्यात अडकलेल्यांची त्यांनी जेवण पाणी वगैरे देऊन खूप मदत केली ! हा जो गुरुद्वारा आहे तो फतेहगढ साहिब, हे गुरू गोविंद सिंग यांचा ७ वर्षांचा मुलगा फतेह सिंग याच्या नावावरून आहे, ज्याला त्याचा ९ वर्षांचा भाऊ जोरावर सिंग यांच्यासह मुघलांनी राज्यपाल वजीर खान यांच्या आदेशानुसार जप्त करून जिवंत गाडले होते. 18 व्या शतकाच्या सुरुवातीस चालू असलेली मुघल-शीख युद्धे. तिथे त्यांनी त्यांच्या सगळ्या जून्या वस्तू खूप छान संग्रही करून ठेवल्या आहेत. यावेळेला घाईत होतो म्हणून लंगर वगैरे काही खाता आला नाही पण त्यांचा चविष्ट प्रसाद त्यांनी आम्हाला दिला जे आमच्याबरोबर काल्या रंगाचे पक्षी सुद्धा खाण्याकरिता येत होते!"

Web Title: marathi-actor-milind-gawali-visit-gurudwara-shri-fatehgarh-sahib-in-punjab-share-experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.