मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ! पत्नी आहे डॉक्टर अन् 'मिस महाराष्ट्र'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:13 IST2025-03-17T09:13:29+5:302025-03-17T09:13:55+5:30
लोकप्रिय अभिनेत्याने माजी 'मिस महाराष्ट्र'सोबत केलं लग्न

मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ! पत्नी आहे डॉक्टर अन् 'मिस महाराष्ट्र'!
गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांच्या घरी सनई चौघडे वाजले आहेत. शिवानी सोनार, दिव्या पुगावकर, अभिषेक रहाळकर, कौमुदी वालोकर या कलाकारांनी साताजन्माची लग्नगाठ बांधली. तर कालच 'बिग बॉस' फेम अभिनेता जय दुधाणेने गुपचूप साखरपुडा केला. आता आणखी एक टीव्ही अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्याचा विवाह झाला आहे.
मराठमोळा अभिनेता कुणाल धुमाळच्या (Kunal Dhumal) लग्नाचे फोटो समोर आले आहेत. काल त्याचा लग्नसोहळा पार पडला. कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत तो देवव्रत कारखानीसच्या भूमिकेत होता. कुणाल या मालिकेमुळे घराघरात पोहोचला होता. कुणालने डॉ. सोनाली काजबेसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुणाल आणि सोनालीचे लग्नात दोन लूक होते. एकामध्ये सोनाली हिरव्या नऊवारीत अतिशय सुंदर दिसत आहे. तर कुणालने पांढरा कुर्ता आणि हिरवा पायजमा घातला आहे. त्याच्या डोक्यावर पारंपरिक टोपी आहे. तर दुसऱ्या लूकमध्ये सोनालीने केशरी लेहेंगा परिधान केला आहे. त्यांचे सुंदर फोटो पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
कोण आहे कुणालची पत्नी?
कुणाल धुमाळची पत्नी सोनाली काजबे डॉक्टर आहे. इन्स्टाग्राम बायोनुसार, तिने डेंटल सर्जनची डिग्री घेतली आहे. ती कन्सल्टंट पेडियाट्रिक डेंटिस्ट आहे. विशेष म्हणजे सोनाली २०१९ ची 'मिस महाराष्ट्र' राहिली आहे.